शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीपूर्ण सामन्यात श्रमिक पत्रकार संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:41 IST

जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत श्रमिक पत्रकार, इतर कर्मचाºयांचा सहभाग असलेल्या संघाने क्रिकेटच्या झटपट प्रकारात सात गडी व दोन चेंडू राखून विजय मिळविला.

ठळक मुद्देक्रिकेटचा झटपट सामना : अटीतटीच्या लढतीत पोलीस विभागाचा पराभव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत श्रमिक पत्रकार, इतर कर्मचाºयांचा सहभाग असलेल्या संघाने क्रिकेटच्या झटपट प्रकारात सात गडी व दोन चेंडू राखून विजय मिळविला. या अत्यंत चुरशीच्या सामन्याचा पोलीस अधीक्षक, इतर बडे अधिकारी, ज्येष्ठ पत्रकार ते नवोदित बातमीदारांनी आनंद घेतला. सामन्याचे यश म्हणजे शरीर सुदृढ ठेवण्याचा महत्त्वपूर्ण संदेश त्यातून देण्यात आला.श्रमिक पत्रकार संघ व पोलीस अधिकारी, कर्मचाºयांच्या एकत्रित संघात झालेल्या १२ षटकांच्या सामन्याचा आस्वाद घेण्याकरिता विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. नाणेफेकीचा कौल पोलीस संघाच्या बाजूने गेला. त्यांनी फलंदाजी करीत ९१ धावांचे लक्ष्य दिले. यात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत कडू यांनी ३६ धावा, एक बळी व झेल घेतला. त्यांच्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. श्रमिक पत्रकार संघाच्या फलंदाजांनी संयमी खेळी करीत लक्ष्याचा पाठलाग केला. सामना अटीतटीचा झाला असताना त्यांनी संयमाने विजय मिळविला.श्रमिक पत्रकार संघाचे विशाल कत्रोजवार, अजय कुमार यांनी उत्तम फलंदाजी केली. गोलंदाजीत अजय कुमार, कर्णधार किशोर मानकर, उप कर्णधार प्रवीण धोपटे, रूपेश खैरी, गजानन गावंडे यांनी चोख कामगिरी बजावली. व्हीसीएने अम्पायर म्हणून नियुक्ती केलेले अभिजीत ढोबळे व पोलीस कर्मचारी सुधाकर हूड यांनी पंचगिरी केली. सामन्याचे समालोचन किशोर पाटील यांनी केले. सत्कार कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. प्रवीण वानखेडे, प्रफुल्ल व्यास यांनी केले तर संजय खल्लारकर यांनी स्कोरर म्हणून काम पाहिले. नाणेफेकीनंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंशी पोलीस अधिकारी, प्रशांत देशमुख यांनी हस्तांदोलन केले. यावेळी हेल्पींग हार्ट चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष सोनाली श्रावणे, व्यावसायिक आसिफ जाहीद शेख उपस्थित होते. पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस, पोलीस उपअधीक्षक सुभाष सावंत, रमेश निमजे, आनंद शुक्ला, ठाणेदार मुरलीधर बुराडे, संतोष शेगावकर यासह नागरिक उपस्थित होते. श्रमिक पत्रकारांच्या संघात प्रशांत हेलोंडे, चैतन्य जोशी, बाळा चतारे, पवन काकडे, धीरज ठावरे यांचा तर पोलीस संघात अचल मलकापुरे, मिलिंद पारडकर, सुबोध ठाकरे, लिंगाडे, ठाकूर यांचाही समावेश होता.किशोर मानकर सामनावीरराष्ट्रीय स्तरावर स्फोटक फलंदाजीने काळ गाजविणारे तथा श्रमिक पत्रकार क्रिकेट संघाचे कर्णधार किशोर मानकर यांनी याही सामन्यात लौकिक राखत सामनावीराचा पुरस्कार प्राप्त केला. मानकर यांनी ४८ धावा करीत दोन षटकांत एक बळी घेतला. सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक बढीये यांनी मानकर यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. क्रिकेटपटू, प्रशिक्षक व संघटक म्हणून योगदान देणाºया जिल्हा क्रिकेट संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष किशोर पोफळी, सचिव अविनाश वंजारी, फलंदाज प्रवीण जगताप, विशाल साठवणे, अभिजीत ढोबळे यांचाही सत्कार करण्यात आला.