शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

कामगारांचे काम बंद आंदोलन

By admin | Updated: June 3, 2016 02:07 IST

रणरणत्या उन्हात गत ५५ दिवसांपासून शांततामय मार्गाने सुगूना फुडस प्रा.लि. वणी (हिंगणघाट) येथील कामगारांचे उपोषण सुरू आहे.

सुगूणा कंपनीतील प्रकार : उपोषणकर्त्यांना समर्थन, पोलिसांचा बंदोबस्तहिंगणघाट : रणरणत्या उन्हात गत ५५ दिवसांपासून शांततामय मार्गाने सुगूना फुडस प्रा.लि. वणी (हिंगणघाट) येथील कामगारांचे उपोषण सुरू आहे. गुरूवारी सुमारे १५० कामगारांनी काम बंद आंदोलन करून कंपनीच्या गेटसमोर नारेबाजी केली. उपोषणकर्त्यांना समर्थन व्यक्त करीत व्यवस्थापनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा याप्रसंगी कामगारांनी दिला. गेटवर पोलीस बंदोबस्त होता. गुरूवारी सकाळी ६ वाजतापासून सुगूना फुडस कंपनीच्या सुमारे १५०-२०० कामगार व कंत्राटी कामगारांनी कामावर न जाता उपोषणकर्त्यांना समर्थन देण्याच्या उद्देशाने काम बंद आंदोलन केले. यावर लवकर तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा कामगारांनी दिला. ५५ दिवसांपासून व्यवस्थापन कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढत नसल्याने आंदोलन प्रदीर्घ चालत आहे. अद्याप तोडगा निघाला नसल्याने सर्व कामगारांनी कंपनीच्या गेटवर जमून काम बंद आंदोलनाची घोषणा केली. २९ मे रोजी सुगूनाच्या कामगारांनी वर्धा येथे कामगार मंत्री प्रकाश मेहता यांना भेटून निवेदन देत चर्चा केली. तोडगा निघेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली; पण अद्याप तोडगा निघाला नाही. काम बंद आंदोलनासाठी पोलीस बंदोबस्त लावला होता.(तालुका/शहर प्रतिनिधी)