शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

प्रशासकीय कारवाईच्या आश्वासनावर ग्रामसेवक कामावर

By admin | Updated: March 6, 2016 02:13 IST

गत १९ दिवसांपासून ग्रामसेवकांनी लेखणीबंद आंदोलन पुकारले होते. यामुळे ग्रामविकासाची कामे खोळंबली होती.

जिल्हाधिकाऱ्यांची मध्यस्थी : ग्रामसेवक दुपारपासून कार्यस्थळी रूजू वर्धा : गत १९ दिवसांपासून ग्रामसेवकांनी लेखणीबंद आंदोलन पुकारले होते. यामुळे ग्रामविकासाची कामे खोळंबली होती. यात शनिवारी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या मध्यस्थीने जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी संजय मीणा यांच्या उपस्थितीत ग्रामसेवकांशी चर्चा झाली. या चर्चेत शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतीची चौकशी प्रशासकीय नियमानुसार करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनावर ग्रामसवेकांनी आंदोलन मागे घेतले असून दुपारपर्यंत आपापल्या कार्यस्थळी रूजू होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुंदन वाघमारे यांनी दिली.ग्रामसेवकांच्या लेखणीबंद आंदोलनामुळे जिल्हातील सर्वच ग्रामपंचायतीची कामे खोळंबली होती. याचा त्रास सर्वसामान्यांना होत होता. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने आंदोलनात सहभागी ग्रामसेवकांना त्यांच्यावर वेतन कपातीची कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. शिवाय त्याची नोंद त्यांच्या सेवापुस्तिकेत करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यांना शुक्रवारपासून कामावर रूजू होण्याच्या सूचना असताना तीन ग्रामसवेक वगळता कुणीही कामावर गेले नाही. यामुळे अखेर जिल्हाधिकाऱ्यांना या आंदोलनात हस्तक्षेप करावा लागला. जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी सीईओ यांच्यासह आंदोलन मंडपाला भेट दिली. येथे त्यांनी सर्वसामान्यांना या आंदोलनाचा त्रास होत असल्याचे म्हणत आंदोलन मागे घेण्यासंदर्भात ग्रामसेवकांना सांगितले.यावर ग्रामसेवक संघटनेने त्यांच्या मागण्या त्यांच्या समक्ष ठेवल्या. यातील होणारी कारवाई जिल्हा परिषदेच्यावतीने प्रशासकीय पद्धतीने करावी, ही मागणी मान्य केली. शिवाय शहरालगत असलेल्या ११ ग्रामपंचायतीची चौकशी प्रशासकीय पद्धतीने करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावर ग्रामसेवकांनी त्यांचे आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. तसेच रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून देण्याचे आश्वासन ग्रामसेवकांनी सीइओ मीणा यांना दिले. त्यांनीही ग्रामसेवकांवरील वेतन कपातीची कारवाई मागे घेण्यात येत असल्याचे मान्य केल्याचे संघटनेने सांगितले. तर या बाबीला सीईओ मीणा यांनी दुजोरा दिला.(प्रतिनिधी)