शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

एकबुर्जी येथील पुलाचे काम दोनवर्षांपासून रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:14 IST

विरुळ-आंजी मार्गावरील एकबुर्जी येथील पुलाचे काम गत दोन वर्षांपासून रखडल्याने नागरीकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथून ये-जा करणाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे.

ठळक मुद्देनागरिकांना त्रास : कामाला गती देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कविरुळ (आकाजी) : विरुळ-आंजी मार्गावरील एकबुर्जी येथील पुलाचे काम गत दोन वर्षांपासून रखडल्याने नागरीकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथून ये-जा करणाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. सदर समस्येकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत थंडबस्त्यात पडलेल्या या कामाला गती द्यावी, अशी मागणी नागरिकांची आहे.सदर पूल जीर्ण झाल्याने नवीन पुलाचे बांधकाम करण्यात नियोजन करण्यात आले. निधी प्राप्त झाल्यानंतर निविदा काढून कंत्राटदाराच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामालाही सुरूवात करण्यात आली. परंतु, सध्या स्थितीत नाल्यावरील सदर पुलाचे काम ठप्प पडले आहे. इतकेच नव्हे तर या पुलाला अद्यापही संरक्षण कठडे न बसविण्यात आल्याने एखाद्या अनुचित घटनेला निमंत्रण मिळत आहे.इतकेच नव्हे तर पुलावर डांबरीकरण सुद्धा करण्यात आले नाही. पावसाळ्याच्या दिवसात या पुलावरून ये-जा करणाºयांना चिखल तुडवतच पुढील प्रवास करावा लागत असल्याने दोन वर्षांपासूनचे रखडलेल्या या पुलाच्या कामाला तात्काळ गती देण्याची मागणी या भागातील नागरिकांची आहे.सर्वत्र असतो चिखलपुलाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात माती असून पावसाळ्याच्या दिवसात या मार्गाने चिखलातूनच वाट काढावी लागते. अनेकदा वाहनेही अनियंत्रित होतात. त्यामुळे अनुचित घटनेला आमंत्रण मिळत आहे.पावसाळ्याच्या दिवसात या नाल्यावरील पुलावर चिखलाचे साम्राज्य राहत असल्याने साधे पाई ये-जा करणेही कठीण होते. या पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांची आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजचेचे आहे.