शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

५०१ ग्रामपंचायतींनी जलसंधारणासाठी घेतला श्रमदानाचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:35 IST

जलसंधारणाच्या कामात ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवून घेण्याच्या उद्देशाने २२ जूनला वर्धा जिल्ह्यातील ५१९ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्याच्या सूचना जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी आठही गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

ठळक मुद्देपंतप्रधानांच्या पत्राचेही झाले वाचन : जलसंवर्धनासाठी उभी होणार लोकचळवळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जलसंधारणाच्या कामात ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवून घेण्याच्या उद्देशाने २२ जूनला वर्धा जिल्ह्यातील ५१९ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्याच्या सूचना जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी आठही गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्ह्यातील तब्बल ५०१ ग्रा.पं.मध्ये महिन्याच्या चौथा शनिवार असतानाही ग्रामसभा पार पडल्या. या ग्रामसभांमध्ये जलसंधारणासाठी श्रमदानाचा ठराव एकमताने घेण्यात आला आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात जलसंवर्धनासाठी एक मोठी लोकचळवळच उभी होऊ पाहत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.यंदाच्या वर्षी वर्धा जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्याचे वास्तव आहे. याच पार्श्वभूमीवर पावसाच्या पाण्याचे योग्य पद्धतीने संवर्धन कसे करता येईल, शिवाय नागरिकांना ‘जल ही जीवन है’ हे पटवून देण्यासाठी जिल्ह्यातील ५१९ ग्रा.पं. मध्ये ग्रामसभा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शिवाय याच ग्रामसभांदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राचे वाचन करणे क्रमप्राप्त होते. वर्धा जिल्ह्यातील ५१९ ग्रा.पं.पैकी ५०१ ग्रा.पं. मध्ये २२ जून या एकाच दिवशी ग्रामसभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राचे वाचन करण्यात आले आहे. तर उर्वरित १८ ग्रा.पं. मध्ये निवडणुकीची आचार संहिता लागू असल्याने ग्रामसभा होऊ शकल्या नाही.१८ ग्रा.पं. मध्ये आचारसंहितेचा परिणाम२२ जूनला पं.स. आष्टी अंतर्गत एक तर सेलू पं.स. अंतर्गत येणाºया १७ अशा एकूण १८ ग्रा.पं. मध्ये ग्रामपंचायतीची आचार संहिता लागू असल्याने या ग्रा.पं. मध्ये ग्रामसभा होऊ शकली नाही.