शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

जागेच्या पट्ट्यांसाठी महिलांची ग्रा.पं. कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:02 AM

स्थानिक वॉर्ड क्र. १ व २ येथील शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या शेकडो महिलांनी कायमस्वरूपी जागेच्या पट्ट्यांच्या मागणीसाठी ग्रा.प. कार्यालयावर धडक दिली. इंदिरा आवास योजनेचा लाभ अतिक्रमण धारकांना देण्यात यावा, अशी मागणीही या आदोलनादरम्यान रेटून लावण्यात आली.

ठळक मुद्देप्रशासनाला सादर केले मागण्यांचे निवेदन : इंदिरा आवास योजनेत समाविष्ट करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : स्थानिक वॉर्ड क्र. १ व २ येथील शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या शेकडो महिलांनी कायमस्वरूपी जागेच्या पट्ट्यांच्या मागणीसाठी ग्रा.प. कार्यालयावर धडक दिली. इंदिरा आवास योजनेचा लाभ अतिक्रमण धारकांना देण्यात यावा, अशी मागणीही या आदोलनादरम्यान रेटून लावण्यात आली. शिवाय विविध मागण्यांचे निवेदन ग्रा.पं. प्रशासनाला सादर करण्यात आले.क्रांतिकारी महिला शेतकरी संघटना यांच्या संयोजिका मंदा ठवरे, पुष्पा परचाके, बेबी झोटिग, पुष्पा गेडाम यांनी सदर आंदोलनाचे नेतृत्त्व केले. मोर्चा काढून ग्रा.पं. कार्यालयावर धडक दिल्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन सरपंच आणि ग्रामविकास अधिकाºयांना देण्यासाठी आंदोलनकर्ते ग्रा.पं. कार्यालयात गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. परिणामी, आंदोलनकर्तांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करून आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर सरपंच विजय तडस यांच्याशी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाºयांनी संपर्क साधून त्यांना सदर आंदोलनाची माहिती दिली. सरपंचाचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनस्थळी सामाजिक कार्यक्रर्ता अब्दुल कदीर यांनी येत आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारले.अतिक्रमण धारकांना इंदिरा आवास योजनेचा लाभ मिळण्यासाठी ग्रामसभेचा विशेष ठराव घेण्यात यावा, आर्थिक दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्रा.पं.ने विशेष प्रयत्न करावे, ज्या आर्थिक दुर्बल घटक कुटुंबियांचे नाव सदर यादीत समाविष्ट नाही अशाचे नाव यादीत समाविष्ट करावे, गावात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून पक्क्या रस्त्यांसह नाल्या बांधण्यात याव्या, सुरेखा कुमरे या अतिक्रमण धारक महिलेला इंदिरा आवास योजनेचा लाभ देण्यात यावा, आदी मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या आहेत. आंदोलनात पुष्पा परचाके, कुसुम शंभरकर, उज्ज्वला भगत, प्रवचनी इंगळे, हेमा बावणे, सुमन बावणे, वर्षा खाटे, कविता लोहकर, विद्या नैताम, रत्नमाला नैताम, कमल गवळी, रंजना भोगांळे, वंदना कामडी, सुरेखा कुमरे, अनुसया कांबळे, सुशीला पुरके, मंगला गोहणे यांच्यासह मोठ्या संख्येने अतिक्रमण धारक महिलांची उपस्थिती होती.आपल्याकडे गिरड व कोरा या दोन ग्रा.पं.चा प्रभार आहे. आंदोलनाची कुठलीही पूर्व सूचना नसल्याने मी कोरा ग्रा.पं. मध्ये होतो. शिवाय तेथे असल्याने आपण गिरड येथील आंदोलनकर्तांचे निवेदन स्विकारू शकलो नाही. सोमवारी आपण स्वत: सदर निवेदन संबंधितांकडे पाठवू.- वासुदेव रोहनकरग्रामविकास अधिकारी, गिरड.सदर आंदोलनाची आपल्याला कुठलीही पूर्व सूचना नव्हती. आंदोलनाच्यावेळी आपण बाहेरगावी होतो. परिणामी, आपण निवेदन स्विकारले नाही. आंदोलनकर्त्यांचे निवेदन आपल्यावतीने अब्दुल कदीर यांनी स्विकारले.- विजय तडससरपंच, गिरड.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतEnchroachmentअतिक्रमण