शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी उद्योगातून आर्थिक उन्नती साधावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:51 IST

महिला बचत गट अधिकाधिक प्रगतीपथावर गेल्यास महिला सक्षम होईल. या माध्यमातून अन्य महिलांना देखील प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देसमीर कुणावार : समुद्रपूर येथे स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा

ऑनलाईन लोकमतसमुद्रपूर : महिला बचत गट अधिकाधिक प्रगतीपथावर गेल्यास महिला सक्षम होईल. या माध्यमातून अन्य महिलांना देखील प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे, असे प्रतिपादन आ. समीर कुणावार यांनी केले.येथे आयोजित बेरोजगार महिला व किशोरी मुलींकरिता स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, माजी पं. स. सदस्य अर्चना वानखेडे, जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, हिंगणघाट पं. स. सभापती गंगाधर कोल्हे, समुद्रपूर पं.स. सभापती कांचन मडकाम, हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, समुद्रपूरच्या नगराध्यक्ष शिला सोनोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, ज्योती कडू, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, पं. स. गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, प्रदीप गयगोले, जि.प. सदस्या शुभांगी डेहणे, जयश्री चौखे, ज्योत्स्ना सरोदे, पं.स. उपसभापती योगेश फुसे, जि.प. सदस्य रोशन चौखे आदी हजर होते.जि.प. अध्यक्ष नितीन मडावी म्हणाले की, महिला या छोट्या गृहउद्योगातून मोठ्या गृह उद्योगपर्यंत प्रगती करू शकेल. महिलांनी उद्योग क्षेत्रात प्रगती साधून स्वबळावर उभे राहण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले.जि.प. सभापती सोनाली कलोडे यांनी गावांचा विकास कारयचा असेल तर स्त्रियांचा विकास होणे आवश्यक आहे. महिलांनी स्वत:हून अशा प्रशिक्षणांमध्ये भाग घेतला पाहिजे. तसेच सर्व महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक ज्योती कडू यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन निलांबरी सदन यांनी तर आभार अनिता भोयर यांनी मानले. देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्र स्तरावर देवळी येथे २९ मार्चला अश्याच पद्धतीचा स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी जि.प. सभापती कलोडे यांनी दिली. मेळाव्याला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.