शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाल नाल्याच्या पाण्यासाठी महिला आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 21:33 IST

लाल नाला प्रकल्पाचे पाणी चंद्रपूरला न देता स्थानिकांना पिण्यासाठी द्यावे या मुख्य तथा अन्य मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी महिला संघटनेने जिल्हा कचेरीवर धडक दिली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत तीन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.

ठळक मुद्देक्रांतीकारी महिला शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लाल नाला प्रकल्पाचे पाणी चंद्रपूरला न देता स्थानिकांना पिण्यासाठी द्यावे या मुख्य तथा अन्य मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी महिला संघटनेने जिल्हा कचेरीवर धडक दिली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत तीन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.शेतात विहिरी व जलसाठा असलेले शेतकरी इतरांना पैसे घेऊन पाणी विकतात. यामुळे अशा शेतकऱ्यांच्या विहिरी शासनाने अधिग्रहीत करून त्या विहिरीचे खोलीकरण करीत ते पाणी स्थानिक लोकांना पुरवावे. शासकीय, निमशासकीय जागेवर २० ते ६० वर्षांपासून स्वत:चे घरे बांधून राहत असलेल्या नागरिकांना मालकीचे पट्टे देऊन अस्थिरतेचे वातावरण दूर करावे. ज्यांची घरे जमीनदोस्त होण्याच्या स्थितीत आहे, अशांना त्वरित घरकूल द्यावे. दोन वर्षांपूर्वी घरकूल योजनेचा लाभ घेतला, त्यांना पुन्हा घरकुलाचे अनुदान देणे संतापजनक आहे. खºया गरजू व आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांना त्याचा लाभ द्यावा. विधवा, निराधार, अपंग व अनाथ महिलांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा. यातही गैरप्रकार टाळून खऱ्या लाभार्थ्यांची निवड करावी तथा गैरप्रकाराची चौकशी करून कार्यवाही करावी. समुद्रपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुंडे यांची चौकशी करून कार्यवाही करावी. आर्थिक दुर्बल, अत्यंत गरीब लोकांचे बीपीएल क्रमांक गहाळ झाले आहे. आर्थिक दृष्ट्या परिपूर्ण असलेल्यांना बीपीएल योजनेचा लाभ दिला जात आहे. याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी तथा गरजूंना लाभ द्यावा आदी मागण्या करण्यात आल्यास आहेत. तीन दिवसांत कार्यवाही न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या अध्यक्ष मंदा ठवरे यांनी दिला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टॅग्स :Damधरण