शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालयावर धडकल्या महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 22:05 IST

चारमंडळ येथे शासकीय स्वस्त धान्य दुकान मिळावे, याकरिता महिला बचतगटाने प्रयत्न केला. पण महिला बचतगटाला डावलून दुसऱ्याच व्यक्तीला दुकान चालविण्याकरिता देण्यात आल्याने महिला बचतगटाच्या सदस्यांसह ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर धडक देत स्वस्त धान्य दुकान महिला बचतगटाला देण्यात यावे, अशी मागणी केली.

ठळक मुद्देस्वस्त धान्य दुकान देण्याची मागणी : अधिकार डावलल्याने झाल्या आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : चारमंडळ येथे शासकीय स्वस्त धान्य दुकान मिळावे, याकरिता महिला बचतगटाने प्रयत्न केला. पण महिला बचतगटाला डावलून दुसऱ्याच व्यक्तीला दुकान चालविण्याकरिता देण्यात आल्याने महिला बचतगटाच्या सदस्यांसह ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर धडक देत स्वस्त धान्य दुकान महिला बचतगटाला देण्यात यावे, अशी मागणी केली.येथील महिला बचतगटाने या आधी स्वस्त धान्य दुकान मिळावे याकरिता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महसूल विभागाकडे मागणी केली होती. त्या मागणीवर विचार न करता व गावातील महिला बचतगट दुकान चालविण्यास तयार असताना महाबळा येथील व्यक्तीस स्वस्त धान्याचे दुकान चालविण्याकरिता देण्यात आले.महिलांना सक्षम करण्यासाठी गावागावात बचत गटाची निर्मिती करण्यात आली. स्वस्त धान्य दुकानासह इतरही कामे बचत गटांना देण्याची भूमिका असतानाही अधिकाऱ्यांकडून त्यांच्या अधिकाराव घाला घातल्या जात आहे.चारमंडळ गावातील महिला बचतगटाला हे दुकान महिलांच्या सक्षमीकरणाकरिता, बचतगटाच्या उत्पन्नाकरिता द्यावे, अशी अपेक्षा बचत गटाला असल्याने त्यांनी रितसर स्वस्त धान्य दुकानाची मागणी महसूल विभागाकडे केली होती. परंतु महिला बचत गटाच्या या मागणीकडे दुर्लक्ष करुन दुसºयालाच परवागनी देण्यात आली. त्यामुळे संतप्त महिलांनी तहसीलदारांना निवेदन सादर करीत प्रशासने केलेली चूक निदर्शनास आणून दिली. सोबतच दुकानाची मागणीही निवेदनातून केली. निवेदन देताना ग्रामपंचायत सदस्य मंगला डफरे, सुनीता चाटे, वैशाली येंगडे, अरुणा करडे, दुर्गा पाटील, रेखा इवनाथे यांच्यासह बचत गटाच्या महिलांसह पुरुष बचत गटाचेही सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार