शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

महिला शेतकरीदिनी महाकाळीत एकवटल्या रणरागिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : महिलांना सक्षम करण्याकरिता त्यांच्या हाताला काम देऊन आर्थिक संपन्न बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र ग्राम सामाजिक ...

ठळक मुद्देसक्षमीकरणाबद्दल मार्गदर्शन : मेळाव्यात दोन तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींमधील ७३५ महिलांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महिलांना सक्षम करण्याकरिता त्यांच्या हाताला काम देऊन आर्थिक संपन्न बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान आणि महिद्रा प्रेरणा उपक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय महिला किसान दिनी महाकाळी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला देवळी व आर्वी तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीमधून ७३५ महिला सहभागी झाल्या होत्या. या सर्व महिलांना उपस्थित मान्यवरांनी व्यवसायाभिमूख मार्गदर्शन केले.कार्यक्र माला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक सुहास पाटील, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानचे जिल्हा कार्यकारी अधिकारी प्रवीण कुºहे, त्रिपाठी, कृषि विज्ञान केंद्र वर्धाच्या डॉ. प्रेरणा धुमाळ, जिल्हा अभियान व्यवस्थापक स्वाती वानखेडे, निरंजन वºहाडे, अभिजीत उबरहांडे, अविनाश फुलबेल आदींची उपस्थिती होती. यावेळी सुहास पाटील यांनी बचत गट उत्पादने, त्यांचे प्रशिक्षण, नागपूर मधील विक्रीच्या संधी, उपक्रमाचा दूर दृष्टीकोण, महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी असलेले लक्ष्य या शिवाय महिला शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे, अशी महिंद्रा प्रेरणा उपक्रमाची विस्तृत माहिती दिली. प्रवीण कुºहे यांनी या २३ गावांमध्ये महिला शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या कामाची माहिती दिली. तसेच आगामी काळात महिला शेतकºयांची प्रेरणा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले. कृषि विज्ञान केंद्राच्या डॉ. प्रेरणा धुमाळ यांनी परसबाग, भाजीपाला प्लॉट, शेवग्याचा प्लॉट, सीताफळ प्लॉट याचे कुटुंबातील महत्व, पोषनासाठी परसबागेचे महत्व, त्यात कोणत्या भाज्या लावल्या जातात त्याची शास्त्रीय कारणे आणि त्यातून जिवनावश्यक कोणते घटक मिळतात. याबाबत विस्तृत माहिती दिली. यावेळी योगिनी सोमन, डॉ. प्रेरणा धुमाळ, नम्रता शिंगोटे-कालेकर यांनी महिलांचे स्वागत केले. कार्यक्रमा दरम्यान यावर्षी चांगले पीक व उत्पन्न घेणाºया १९ महिलांना प्रेरणा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन नामदेव आखाडे तर आभार अभिजीत देव यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामपरिवर्तक उपस्थित होते.या गावामील महिलांची होती उपस्थितीया कार्यक्रमाला देवळी तालुक्यातील वाटखेडा, डिगडोह, तळणी (भागवत), गिरोली, भिडी, मलकापूर, लोणी, नांदोरा, सोनोरा (ढोक), पळसगाव, फत्तेपूर, कवठा (रेल्वे) तर आर्वी तालुक्याच्या परसोडी ( टेंभरी), पिंपळगाव (भोसले), बेल्हारा, तळेगाव (रघुजी), काचनूर, बोदड, वाडगाव (पांडे) सालदरा, हिवरा या गावातील महिला सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :WomenमहिलाFarmerशेतकरी