शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिलांची ग्रा.पं.वर धडक

By admin | Updated: May 21, 2017 01:00 IST

गावात गत आठ दिवसांपासून नळ न आल्याने नागरिकांची पाण्याकरिता धावपळ होत आहे.

आठ दिवसांपासून नळ नाही : सरपंचाच्या उत्तराने महिला आक्रमक लोकमत न्यूज नेटवर्क रोहणा : गावात गत आठ दिवसांपासून नळ न आल्याने नागरिकांची पाण्याकरिता धावपळ होत आहे. यामुळे संतापलेल्या महिलांनी ग्रामपंचायत सदस्य तृप्ती पावडे यांच्यासह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. यावेळी महिलांनी त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया सरपंच व उपसरपंचांना सुनावल्या. त्यावेळी सरपंचांनी विद्युत पुरवठा नियमित नसणे, विद्युत मोटार जळणे, अशी नेहमीची रडगाणी ऐकवत हतबलता व्यक्त केली. येथील पाणी पुरवठा योजना वर्धा नदीवरुन आहे. नदीला पाणी आहे; पण वारंवार पाण्याचा पंप जळणे, मोटारची पर्यायी व्यवस्था न करणे तसेच पाण्याचे वाटप समप्रमाणात करण्याच्या नियोजनाच्या अभावाने गावात कृत्रीम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी शेतमजूर व गोपालक पाण्यासाठी त्रस्त झाले आहे. रोहण्यातील काही वॉर्डात आठ ते दहा दिवसांपासून नळ आलेले नसताना सरपंचाच्या घराच्या लाईनवरील नळांना दररोज पाणी कसे येते, असा संतप्त सवाल महिलांनी सरपंचासमोर उभा केला. यावर सरपंचाने माझे घर खोलगट भागात आहे, असे सांगताच महिला आणखीच भडकल्या. आठ दिवसांपूर्वी जळालेली मोटार चालू करताच पुन्हा जळाली असेल तर पर्यायी मोटारची व्यवस्था करण्याची जबाबदारी ग्रामपचांयतीची आहे, असे महिलांनी यावेळी विचारले. यावर सरपंचांनी तुमच्या शेतातली मोटार जळाल्यावर आठ-दहा दिवस तुमचे ओलीत थांबते की नाही, असे उर्मट उत्तर दिल्याने महिला पुन्हा आक्रमक झाल्या. एकंदरीत ग्रामपंचायत प्रशासन विद्युत पुरवठ्याच्या भारनियमना आड स्वत:ची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.