पालकमंत्री : जगात सेवेशिवाय दुसरा मंत्र नाहीवर्धा : आजचा दिवस सेवा अर्पण करण्याचा संकल्प दिवस आहे. आरोग्य शिबिरामध्ये जास्त रुग्ण येणे ही शिबिराची यशस्विता असली तरी आपण रुग्णसेवा पुरविण्यात कुठेतरी कमी पडतो आहोत. ग्रामीण भागातील एकही व्यक्ती आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही, या दृष्टीने आरोग्य सेवेचे जाळे निर्माण करण्याची गरज ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. महिला आरोग्यासह संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळतात पण त्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. महिलांनी नियमितपणे स्वत:च्या आरोग्याची तपासणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात माजी खासदार दत्ता मेघे यांनी वर्धा जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. यापुढे जिल्ह्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची खबरदारी घेतानाच डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा पुरविताना अधिक संवेदनशील असावे, असे सांगितले. खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर मेघे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. प्रकाश आमटे यांच्या प्रकल्पाला दत्ता मेघे आयुर्विज्ञान विद्यापीठाद्वारे १० लाख रुपयांचा निधी देण्यात आला. तसेच महेश मोकलकर व दीपेश देहाडिया यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी केले. संचालन संजय इंगळे तिगावकर यांनी केले. आभार अभ्युदय मेघे यांनी मानले. यावेळी लोकबिरादरी प्रकल्पाचे डॉ. दिगंत आमटे, रोटरीचे मधु रुघवानी, किशोर केडिया, महेश मोकलकर, राहुल सराफ, आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. देशपांडे, डॉ. पटेल, अधिष्ठाता डॉ. श्रीवास्तव, डॉ. पखान, डॉ. भुतडा, डॉ. ललित वाघमारे, डॉ. गोयल, डॉ. मीनाक्षी येवला, जि. प.चे उपाध्यक्ष विलास कांबळे, शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, प्रशांत इंगळे तिगावकर, जयंत कावळे उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)
महिलांनी आरोग्याबाबत नेहमी सजग असावे
By admin | Updated: September 27, 2015 01:37 IST