शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

खाकीतील सावित्रींचे सौभाग्यासाठी वटवृक्षाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 15:38 IST

कोरोना संकट काळात वटपौर्णिमेचे औचित्य साधून आपल्या कर्तव्यासह पत्नीधर्माचे पालन शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केले. याप्रसंगी महिला पोलिसांनी खाकी वर्दी परिधान करून कोरोनाचे संकट जाऊ दे तसेच माझ्या पतीला दीर्घ आयुष्य लाभू दे, असे साकडेच वटवृक्षाला घातले.

ठळक मुद्देकोरोना संकटात कर्तव्यासह निभविला पतीव्रतेचा धर्म

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: कोरोना संकट काळात वटपौर्णिमेचे औचित्य साधून आपल्या कर्तव्यासह पत्नीधर्माचे पालन शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केले. याप्रसंगी महिला पोलिसांनी खाकी वर्दी परिधान करून कोरोनाचे संकट जाऊ दे तसेच माझ्या पतीला दीर्घ आयुष्य लाभू दे, असे साकडेच वटवृक्षाला घातले.सध्या देशासह जगातील विविध देश कोरोना संकटाशी लढा देत आहे. अशातच कोविड योद्धा म्हणून पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारीही सेवा देत आहेत. सतत २४ तास सेवा देणाऱ्या पोलीस विभागातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना यंदाच्या कोरोना संकटात वटपौर्णिमेचे औचित्य साधून पतीव्रता धर्माचे पालन करणे थोडे कठीण होते. पण त्यावरही मात करून पहिले कर्तव्य आणि त्याच बरोबर रुढीपरंपरेनुसार धर्माचे पालन आज शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केले. शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी ज्योती देवकुळे, अलका टिपले, संगीता तामगाडगे, प्रिती ढेपे, रंजिता कोडापे यांच्यासह गृहरक्षक दलातील रेखा नैताम, शुभांगी मेश्राम, सोनम निकुडे यांनी शुक्रवारी शहर पोलीस ठाण्याच्या आवारातील वटवृक्षाचे पूजन केले.

कर्तव्यही गरजेचेच - टिपलेप्रत्येक वर्षी आम्ही वटपौर्णिमेचे औचित्य साधून घरी वटवृक्षाचे पूजन करीत होतो. परंतु, यंदा कोरोना संकटामुळे आम्हाला सलग २४ तासही कर्तव्य बजावावे लागत आहे. खाकी परिधान केल्यावर आम्ही कर्तव्याला प्राधान्य देतोच. कोरोनाच्या संकटात कर्तव्याला प्राधान्य देऊन आम्ही आज रुढीपरंपरेनुसार भारतीय नारी म्हणून वटवृक्षाचे पूजन केले आहे. खाकीवर्दीत वटपौर्णिमा साजरी करताना आम्हाला एकप्रकारे गर्वच वाटत आहे, असे महिला पोलीस कर्मचारी अलका टिपले यांनी सांगितले.

टॅग्स :Socialसामाजिक