शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे महिला दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 22:21 IST

स्थानिक ठाकरेपुरा येथील खासगी डॉ. सुरेश गाडेकर यांच्या चुकीच्या उपचारामुळे महिला दगावल्याचा आरोप करून परिसरातील संतप्त नागरिकांनी आणि मृताच्या कुटुंबीयांनी मृतदेह थेट पोलीस कचेरीत नेला. संतप्त नागरिकांनी सदर डॉक्टरावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी पोलीस कचेरीत ठिय्या दिला.

ठळक मुद्देमृतदेह पोलीस कचेरीत आणून दिला ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : स्थानिक ठाकरेपुरा येथील खासगी डॉ. सुरेश गाडेकर यांच्या चुकीच्या उपचारामुळे महिला दगावल्याचा आरोप करून परिसरातील संतप्त नागरिकांनी आणि मृताच्या कुटुंबीयांनी मृतदेह थेट पोलीस कचेरीत नेला. संतप्त नागरिकांनी सदर डॉक्टरावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी पोलीस कचेरीत ठिय्या दिला.ठाकरेपुरा येथील लिला उगेमुगे (७०) ही महिला उपचार घेण्यासाठी डॉ. सुरेश गाडेकर यांच्याकडे गेली होती. उपचारादरम्यान डॉक्टरांनी सदर महिलेला दोन इंन्जेक्शन दिले. तसेच खाण्यासाठी खुल्या गोळ्यांची भुकटी आणि जवळच्या काही गोळ्या दिल्या. उपचारानंतर ही महिला घरी परत आली असता अवघ्या दहा ते पंधरा मिनिटाचे अवधीत तिची प्रकृती खालवली. घाबरलेल्या कुटुंबियांनी याबाबतची माहिती संबंधीत डॉक्टरला देवून तपासणी केली असता ही महिला हृदयविकाराच्या धक्क्याने दगावल्याचे सांगण्यात आले. याबाबतची कुणकुण परिसरातील नगरिकांना लागली असता त्यांनी सदर डॉक्टरच्या दवाखान्यासमोर व मृतकाचे घरासमोर एकच गर्दी केली. शिवाय डॉक्टरांच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित केली. यापूर्वी अशा प्रकारच्या काही घटना या डॉक्टराच्या हाताने झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी खा. रामदास तडस तसेच नगरसेवक नंदू वैद्य यांनी केली आहे.दर्शनीय फलकावर शिक्षणाचा उल्लेख नाहीलकवा आजारावर हमखास इलाज करण्याची या डॉक्टराची ख्याती राहिली आहे. त्यामुळे शंभर ते दीडशे कि़मी. अंतरापासूनच्या रुग्णांची याठिकाणी गर्दी राहते. असे असले तरी दवाखान्याच्या दर्शनीय भागात लावण्यात ंआलेल्या फलकावर डॉक्टरांनी कुठले कुठले शिक्षण घेतले याचा उल्लेखच नाही, असाही आरोप यावेळी करण्यात आला.औषधांसह काही कागदपत्रे केली जप्तयाबाबतची तक्रार शनिवारी रात्री पोलिसात देण्यात आली. याप्रकरणी देवळी पोलिसांनी आकस्किम मृत्यूची नोंद घेतली आहे. पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच सदर डॉक्टरच्या न.प. ले-आऊट येथील राहते घराची तसेच ठाकरेपुरा येथील खासगी दवाखान्याची झडती घेतली. तेथून इंन्जेक्शन व औषधीचे काही नमुने तसेच डॉक्टरकडे असलेली डिग्री संबंधीचे कागदपत्रे ताब्यात घेतली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर आणि उपनिरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनात देवळी पोलिसांनी केली.सदर डॉक्टरने उपचारासाठी वापरलेली औषधी, इंन्जेक्शन तसेच बाळगलेली डिग्री ताब्यात घेण्यात आली आहे. संबंधीत औषधी व प्राप्त होणारा शवविच्छेदनाचा अहवाल तज्ज्ञांसह मेडीकल बोर्डकडे पाठवण्यात येईल. शिवाय त्यानुसार गुन्ह्याचे स्वरूप ठरवून पुढील कारवाई करण्यात येईल.- नितीन लेव्हरकर, ठाणेदार, देवळी.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलDeathमृत्यू