शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चाकूने वार करून महिलेची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 23:46 IST

मुलीला पळवून नेल्याचा राग मनात बाळगुन तिघांनी संगणमत करीत एका ५० वर्षीय महिलेची चाकूने मारहाण करून हत्या केली. ही घटना आर्वी तालुक्यातील पिपरी (भाईपूर) पुनर्वसन येथे शनिवारी सायंकाळी उशीरा घडली.

ठळक मुद्देतिघांना अटक : पिपरी (भाईपूर) पुनर्वसन येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : मुलीला पळवून नेल्याचा राग मनात बाळगुन तिघांनी संगणमत करीत एका ५० वर्षीय महिलेची चाकूने मारहाण करून हत्या केली. ही घटना आर्वी तालुक्यातील पिपरी (भाईपूर) पुनर्वसन येथे शनिवारी सायंकाळी उशीरा घडली. बेबी लक्ष्मण मेंढे रा. कवडगव्हाण ता. तिवसा, जि. अमरावती, ह.मु. पिपरी (भाईपूर) पुनर्वसन, असे मृतक महिलेचे नाव असून या प्रकणातील तिनही आरोपींना आर्वी पोलिसांनी अटक केली आहे. उमेश काळे, गणेश काळे व ऋषिकेश वडतकर असे अटक केलेल्या आरोपींचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलीस सूत्रानुसार, गणेश काळे याच्या मुलीला मृतक बेबी मेंढे याच्या मुलाने पळवून नेल्याचा ठपका ठेवून त्याच विषयाला अनुसरून वारंवार बेबी मेंढे यांच्याकडे विचारणा करण्यात आली. परंतु, त्यांच्याकडून पाहिजे तसा प्रतिसाद न मिळत असल्याचा राग मनात धरून एकतर तिच्याकडून माहिती घ्यायची अन्यथा तिला जीवानिशीच संपवायचे असे संगणमत करून आरोपी उमेश काळे, गणेश काळे व ऋषिकेश वडतकर यांनी बेबी मेंढे यांच्या घरात प्रवेश केला. सुरूवातीला शाब्दिक चकमक उडाल्यानंतर आरोपींनी सोबत आणलेल्या चाकूने बेबीला मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या बेबी मेंढे यांना अमरावती येथील रुग्णालयात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती आर्वी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी तेजस मेंढे याच्या तक्रारीवरून आर्वी पोलीस ठाण्यात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी उमेश काळे, गणेश काळे व ऋषिकेश वडतकर यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास आर्वी पोलीस करीत आहे.आरोपी अन् मृत पूर्वी राहायचे एकाच गावातमृतक बेबी मेंढे या अमरावती जिल्ह्यातील कवडगव्हाण येथील मुळ रहिवासी आहेत. वाद होऊ नये म्हणून त्या मागील काही महिन्यांपासून पिपरी भाईपूर पुनर्वसन येथील कृष्णराव देवकाते यांच्या घरी किरायाणे राहत होत्या.सदर प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तीन आरोपींपैकी उमेश काळे आणि गणेश काळे हे अमरावती जिल्ह्यातील कवडगव्हाण येथील तर ऋषिकेश वडतकर हा मोझरी येथील रहिवासी आहे. काळे आणि मेंढे परिवार पूर्वी एकाच गावात रहात होता, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.

टॅग्स :Murderखून