शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायी अजस्त्र वृक्षांवर वाळवीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:36 IST

शीतल छाया देणाऱ्या अजस्त्र झाडांवर सध्या वाळवीचे संकट निर्माण झाल्याने झाडे धोक्यात आली आहे. या झाडांना वाळवीमुक्त करण्याचा प्रयत्न होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देनिर्मूलनासाठी टाकले मिठाचे पाणी : शासन, संघटनास्तरावर प्रयत्नांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शीतल छाया देणाऱ्या अजस्त्र झाडांवर सध्या वाळवीचे संकट निर्माण झाल्याने झाडे धोक्यात आली आहे. या झाडांना वाळवीमुक्त करण्याचा प्रयत्न होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.रस्त्याच्या दुतर्फा, शेतशिवारात आजही मोठ्या प्रमाणात देशी आणि बहुगुणी झाडे आहेत. या झाडांमुळे ही जीवनसृष्टी सजीव असल्याचे दिसते. झाडांचे महत्त्व संत महात्म्यांपासून तर पर्यारणातज्ञांनी सांगितले आहे. पंजोबा, आजोबा, वडिलांनी लावलेली झाडे विस्तीर्ण वाढून आज शीतल छाया, शुद्ध हवा, फळे, लाकडे आदी देत आहेत. शासनदेखील रोडच्या दुतर्फा असलेल्या झाडांना पूर्वी चुना आणि गेरू मारून संरक्षण देत होते. ही रंगविलेली झाडे रात्री वाहन चालकांना सावधान करण्याचे काम करीत होती. ती शेतकरी वाटसरू व गुरांसाठी विश्रामाची हक्काची जागा होती. आता विकासाच्या नादात या अजस्त्र झाडांची कत्तल केली जात आहे.वृक्षांचे महत्त्व पटल्याने झाडे लावण्यावर भर दिला जात आहे; पण त्या झाडांकडे लक्ष दिले जात असल्याचे दिसत नाही. वास्तविक, जुनी झाडे वाचविणे व त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. सध्या सेवाग्राम, वर्धा, कांढळी, नागपूर, जाम आदी मार्गांवरील झाडांना वाळवी लागल्याचे दिसून येत आहे. यामुळे बहुमूल्य झाडे वाळत आहे. यात कडूनिंब, आंबा या झाडांचा समावेश आहे. वाळवी जमिनीपासून झाडांना लागते. हळूहळू संपूर्ण झाड काबीज करून झाड वाळते. चुना व गेरू मारल्यास झाडांना वाळवी लागत नाही व आयुष्यही वाढते. वाळवी लागलेली झाडे शाबूत ठेवण्याकरिता तथा त्यांचे संगोपन करण्यासाठी शासन व सामाजिक स्तरावर कार्यवाही करणे गरजेचे आहे.प्रत्येक वर्षी शासनाकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. आता वृक्षांच्या संरक्षणावरही खर्च केला जात आहे; पण जुन्या झाडांच्या संगोपानाकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांच्या कामांसाठी अजस्त्र वृक्ष कापले जात आहे. यावर तोडगा काढत झाडे न कापता विकास कामे करणे तथा वृक्षांचे संरक्षण करणे गरजेचे झाले आहे.या करता येतात उपाययोजनावाळवी लागलेल्या वृक्षांचे संगोपन, संरक्षण करण्याकरिता अनेक उपाययोजना केल्या जातात. काही ठिकाणी मीठ, कडूनिंबाच्या बिया, मोरचूद, शेण, गोमुत्र आदींचे वेगवेगळे द्रावण तयार करून ते झाडांवर शिंपडले जाते. याचा वाळवी लागलेल्या वृक्षांना फायदा होतो. शिवाय परसबाग तसेच काही वृक्षप्रेमी मीट व मिठाच्या द्रावणाचा उपयोग करतात, अशी माहिती आहे. महात्मा गांधी आश्रमातील गांधीजींनी लावलेल्या पिंपळाच्या झाडाला किडे लागले होते. त्यावरही सदर प्रयोग करण्यात आला असून तो यशस्वी झाला. शासन, सामाजिक संस्थांनी या दृष्टीने उपाययोजना करणे अगत्याचे झाले आहे.