शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
3
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
4
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
5
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
6
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
7
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
8
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
9
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
10
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
11
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
12
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
13
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
14
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
15
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
16
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
17
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
18
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
19
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
20
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट

मोर्शी व खरसखांडा येथे पाण्यासाठी हाहाकार

By admin | Updated: April 11, 2016 02:15 IST

तालुक्यतील मोर्शी व खसरखांडा या दोनही गावात पाण्याकरिता हाहाकार माजला आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाण्याच्या थेंबाकरिता भटकंती करण्याची वेळ आली आहे.

विहिरी कोरड्या : उपसरपंच स्वर्खाने गावाला पुरवितो पाणीकारंजा (घाडगे) : तालुक्यतील मोर्शी व खसरखांडा या दोनही गावात पाण्याकरिता हाहाकार माजला आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाण्याच्या थेंबाकरिता भटकंती करण्याची वेळ आली आहे. तालुका टॅँकरमुक्त जाहीर झाल्यामुळे पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी गावाला टॅँकरने पाणी पुरवठा करण्याकरिता असमर्थता दर्शविली. गावकऱ्यांची पाण्याची निकड लक्षात घेता येथील उपसरपंच नामदेव देवासे गत एक महिन्यापासून स्वखर्चाने आपल्या टॅँकरने गावाला पाणी पुरवठा करीत आहेत.मोर्शीची लोकसंख्या जवळपास एक हजार आहे. गावात चार हॅँडपंप व नळयोजनेची एक आणि इतर तीन खाजगी विहिरी आहेत. नळयोजनेची विहीर, हॅँडपंप व इतर खाजगी विहिरींनी तळ गाठला आहे. शेत शिवारातील विहिरींची पातळी अत्यंत खोल गेल्यामुळे, पिण्यासाठी पाणी द्यायला कोणीही तयार नाही. उपसरपंच देवासे यांनी पंचायत समिती व तहसील कार्यालयाला याची माहिती कळविली आहे. तालुका टॅँकरमुक्त झाल्यामुळे टॅँकरने पाणी पुरवठा करता येत नाही, असे सांगण्यात आले. तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्याचे आश्वासन दिले. गावात चारा पाणी नसल्यामुळे गुरांचेही हाल होत आहे. गावातून जनावरांचे स्थलांतरण होत आहे. यामुळे उपसरपंचाने गावात स्वत:च्या दोन टॅँकरने दररोज पाच टॅँकर पाणी गावाला एक महिन्यापासून पुरवित आहे. ते ठाणेगाव येथील चौबे यांच्या विहिरीतून १०० रुपये प्रति टॅँकर दराने स्वखर्चाने पाणी विकत घेवून गावकऱ्यांची तहान भागवित आहेत.(तालुका प्रतिनिधी)