शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

आधार लिंकशिवाय खत नाही

By admin | Updated: May 8, 2017 00:37 IST

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांची कामे आटोपत असून त्यांच्याकडून बी-बियाणे आणि खताच्या खरेदीची लगबग सुरू होण्याचे संकेत आहे.

नोंदणीकृत खत विक्री केंद्रांत लागणार पॉस मशीन लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांची कामे आटोपत असून त्यांच्याकडून बी-बियाणे आणि खताच्या खरेदीची लगबग सुरू होण्याचे संकेत आहे. यातच शासनाने कृषी केंद्रातून यंदा शेतकऱ्याचे आधार कार्ड लिंक केल्याशिवाय खत मिळणार नसल्याचे धोरण ठरविले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी दुकानात जाताना आधार कार्ड घेवूनच जाणे बंधनकारक झाले आहे. वर्धा जिल्ह्यात कृषी विभागाकडे एकूण ६०५ खत विक्रेत्यांची नोंदणी झाली. या सर्वच दुकानांत ही मशीन लागणार आहे. मशीन लावण्याच्या कामाला १५ मे पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे आधार कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांनाच खत मिळेत असे संकेत आहे. या मशीनच्या वापरासंदर्भात कृषी विभाग आणि खत विक्रेत्यांना प्रशिक्षण देणे सुरू आहे. पहिल्या टप्प्यात तीन तालुक्यातील खत विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यात देण्यात आले आहे. उर्वरीत व्यावसायिकांना येत्या १२ मे रोजी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या या पॉस मशीनची चर्चा असली तरी त्याच्या वापरावरून गोंधळ निर्माण झाला आहे. शेतीचा हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांकडून उन्हाळवाहीला प्रारंभ झाला आहे. वखरणी होताच खते आणि बियाण्याच्या खरेदीची शेतकऱ्यांची लगबग सुरू होणार आहे. अशात या पॉस मशीनच्या गोंधळामुळे घोळाची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कृषी विभागाने या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. सबसिडीवर चाप खत विक्री करताना कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात सबसिडीचा घोळ होत होता. आता या घोळाला पॉस मशीनमुळे चाप बसणार आहे. या मशीनमध्ये जोपर्यंत शेतकऱ्याचे आधार कार्ड लिंक होणार नाही तोपर्यंत खताची उचल होणार नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे विक्री दाखवून सबसिडी उचलणाऱ्यांचे धाबे दणानले आहे. अनेकांकडून होते धूळपेरणी वर्धा जिल्हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. कापसाचे भरघोस उत्पादन घेण्याकरिता येथील शेतकऱ्यांकडून धूळपेरणी करण्यात येते. या पेरणीदरम्यान शेतकऱ्यांना खताची गरज भासणार आहे. अशा वेळी या पॉस मशीनमुळे त्यांचे नियोजन बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुबलक खत आणि बियाणे जिल्ह्यात यंदाच्या खरीपात बियाण्याकरिता आणि खतांकरिता शेतकऱ्यांना भटकण्याची वेळ येणार नसल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. यंदा होणाऱ्या पेऱ्याला ७२ मेट्रीक टन खताची मागणी कृषी विभागाकडून करण्यात आली होती. यापेक्षा अधिक खत जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. मागणीच्या तुलनेत १.२८ मेट्रीक टन खत अतिरिक्त असल्याचे कृषी विभाकडून सांगण्यात आले आहे. कापूस उत्पादक जिल्हा असल्याने येथे कपाशी बियाण्यांच्या ९.८० लाख पाकिटांची गरज आहे. मात्र जिल्ह्याला १६ लाख पाकिटे मिळणार आहे.