शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम सुरक्षारक्षकाविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:58 IST

बँकेत वाढत असलेली गर्दी कमी करण्याकरिता एटीएमची सुविधा अस्तित्वात आली. येथे नागरिकांना कोणत्याही क्षणी रक्कम काढणे सहज शक्य झाले. आता गावखेड्यातही एटीएमच पोहोचले आहेत.

ठळक मुद्देसर्वत्र सारखीच स्थिती : चोरट्यांना मेजवानी; वर्धेत यापूर्वी घडल्या तीन घटना, तरीही दुर्लक्षच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बँकेत वाढत असलेली गर्दी कमी करण्याकरिता एटीएमची सुविधा अस्तित्वात आली. येथे नागरिकांना कोणत्याही क्षणी रक्कम काढणे सहज शक्य झाले. आता गावखेड्यातही एटीएमच पोहोचले आहेत. नागरिकांना यातून सुविधा निर्माण झाली तरी हे एटीएम चोरट्यांकरिता नवा मार्ग देणारे ठरत आहेत.असाच प्रकार नुकताच तुमसर येथे घडला. चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम कापून रक्कम लांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षक येथून बेपत्ता होता. वर्धेतही असा प्रकार होण्याची शक्यता आहे काय ? याची पाहणी करण्याकरिता वर्धेत गुरुवारी लोकमतच्यावतीने स्टींग आॅपरेशन करण्यात आले. यात वर्धेत असा प्रकार सहज शक्य असल्याचे दिसून आले. शहरातीलच नाही तर ग्रामीण भागातीलही एटीएमची सुरक्षा वाºयावच असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात आठही तालक्यात विविध बँकेचे एकूण सुमारे २०० एटीएम आहेत. या एटीमची सुविधा नागरिकांना मिळत आहे. या एटीएममध्ये पैसे भरण्यापासून तर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी एका विशिष्ट संस्थेकडे दिली आहे. त्याचा तसा कंत्राटच आहे. एटीएमवर बँकेच्या नावाचे फलक तेवढे दिसून आले आहे. वर्धा शहरातील मुख्य बाजारात असलेल्या एकूण १० एटीएमला लोकमतच्या चमूने भेट दिली. यापैकी मुख्य मार्गावरील दोन एटीएमवर सुरक्षा रक्षक दिसून आले. इतर ठिकाणी मात्र सुरक्षा रक्षक गैरहजरच होते. यामुळे भरदिवसा चोरची शक्यता नाकारता येत नाही.