शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

विष पाजून काढला पत्नीच्या प्रियकराचा काटा

By admin | Updated: November 13, 2014 23:05 IST

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याची बाब लक्षात येताच संतप्त झालेल्या पतीने तिच्या प्रियकराचा विष पाजून काटा काढल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. प्रारंभी या प्रकरणात आकस्मिक

पती-पत्नीला अटक : तीन आरोपी फरारतळेगाव (श्या़पंत़) : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याची बाब लक्षात येताच संतप्त झालेल्या पतीने तिच्या प्रियकराचा विष पाजून काटा काढल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. प्रारंभी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासात सदर प्रकार समोर आल्याने परतोडा येथील पती पत्नीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृतकाचे नाव निलेश बाळकृष्ण कुयटे (२२) असे असून त्याला विष देणाऱ्याचे नाव संतोष पचारे असे आहे. यात आणखी तीन आरोपी असून ते फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस सूत्रानुसार, परतोडा येथील एका विवाहितेसोबत निलेशचे अनैतिक संबध होते. याची चर्चा गावात होती़ दीड वर्षापूर्वी मृतक व सदर महिलेला तिच्या पतीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. यावेळी बदनामीपोटी महिलेने निलेशविरूद्ध विनयभंगाची तक्रार तळेगाव पोलिसांत दाखल केली होती़ यावरून पोलिसांनी निलेश विरूद्ध ३५४ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती़ तरीही निलेशचे व सदर महिलेचे संबध सुरूच होते. याची माहिती सदर महिलेच्या पतीला मिळाली. यात पत्नीमार्फत १० आॅक्टोबर रोजी निलेशला परतोडा येथील अभिजीत बोके यांच्या शेतात बोलावून त्याला जबरीने विष पाजले. यावेळी त्याच्या सोबत आणखी काही जण होते. निलेशचा मृतदेह शेतात टाकून सर्वजण तिथून निघून गेले़ त्याच दिवशी बोके यांच्या शेतात निलेशचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवालात निलेशने विष घेतल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान मृतकाच्या आईने माझ्या मुलाने आत्महत्या केली नसून विष पाजून त्याची हत्या केल्याचा आरोप करीत पोलिसात तक्रार दाखल केली. शिवाय त्यांनी घटनेच्या दिवशी निलेशला पचारे यांच्या मुलाने घरी येवून बोके यांच्या शेतात बोलावून नेल्याचे सांगितले. मृतकाच्या आईने दिलेल्या बयानावरून पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात पोलिसांनी पचारे दाम्पत्याला ताब्यात घेवून त्यांना विचारणा केली. यात सदर प्रकार समोर आला. यावरून पोलिसांनी आरोपीविरूद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार झामरे यांच्या मार्गदर्शनात शेख मुसा पठाण, सचिन दवाळे, घनश्याम लांडगे, कापसे करीत आहेत.(वार्ताहर)