शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

रोडरोमिओंना आवरणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 22:07 IST

दादाजी धुनिवाले चौक आणि बॅचलर रोडच्या दुतर्फा रोडरोमिओ, गुन्हेगारी प्रवृत्तीने गत काही महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. यामुळे रहिवासी नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. रोडरोमिओ, टवाळखोरांना बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देधुनिवाले चौक, बॅचलर रोड : रात्री उशिरापर्यंत धिंगाणा सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दादाजी धुनिवाले चौक आणि बॅचलर रोडच्या दुतर्फा रोडरोमिओ, गुन्हेगारी प्रवृत्तीने गत काही महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. यामुळे रहिवासी नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. रोडरोमिओ, टवाळखोरांना बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.दादाजी धुनिवाले चौकापासून आर्वी नाका चौकापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सौंदर्यीकरण पूर्णत्वास गेले आहे. मार्गाच्या दुतर्फा पादचाऱ्यांकरिता पदपथ (फुटपाथ) तयार करण्यात आला आहे. मात्र, हे पदपथ टवाळखोर, गुन्हेगारी प्रवृत्तीने ताब्यात घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.पदपथावरच अनेकांनी अतिक्रमण करीत व्यवसाय थाटले आहे. शिवाय, मार्गालगतच एक कॅफे असून येथेही प्रेमीयुगुलांची सायंकाळनंतर गर्दी उसळते. धुनिवाले चौकात पेट्रोलपंप परिसरात पानठेले व खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांचा घेत तरुणांकडून मद्याचे घोटही रिचविले जातात. येथेच युवकांचे टोळके रात्री उशिरापर्यंत टवाळखोरी करताना दिसून येतात. याचा मार्गाने ये-जा करणाऱ्यांसह रहिवासी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.शिकवणी वर्गावरून येणाऱ्या तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे. याकडे शहर पोलिसांचे दुर्लक्ष होत असून पोलिसांचा कारभार कारभार ढेपाळल्याने हा विभाग अस्तित्वात आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती, टवाळखोर युवकांचा बंदोबस्त करावा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या परिसरातील रहिवासी नागरिक, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.महिनाभरापूर्वी झाला चाकूहल्लाधुनिवाले चौकात पेट्रोलपंपाशेजारी असलेल्या पानठेल्यावर टोळक्यातील युवकांनी यथेच्छ मद्यप्राशन केले. यानंतर क्षुल्लक कारणावरून वाद उफाळून आला आणि त्याचे पर्यवसान युवकावर चाकूहल्ला करण्यात आले. यात युवक गंभीर जखमी झाला. दरम्यान, काही काळ चौकात भीतीचे वातावरण होते. पोलिस विभाग या घटनेपासूनही अनभिज्ञ दिसून आला.धुनिवाले चौकात अनेकांकडून खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, पानठेले लावून पदपथावर अतिक्रमण करण्यात आले आहे. या गाड्यांवर सायंकाळनंतर प्रचंड गर्दी उसळते. मात्र, ग्राहकांकडून वाहने अर्ध्या रस्त्यापर्यंत उभी केली जातात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असून दररोज वाहतूक व्यवस्था कोलमडते. येथे अपघाताची शक्यताही बळावली आहे. याकडे वाहतूक नियंत्रक पोलिसांना कानाडोळा आहे.बेफाम वाहने पिटाळणाऱ्यांचा हैदोसधुनिवाले चौक ते आर्वी नाका रस्ता गुळगुळीत झाला आहे. याचा फायदा घेत युवकांकडून बेफाम वाहने पिटाळली जातात. हे चित्र येथे दररोजच पाहायला मिळते. याकडेही कुणी लक्ष द्यायला तयार नसल्याने अपघाताची मोठी घटना घडण्याची भीयी नागरिकांनी व्यक्त केली आहे.चार्ली पथके गेली कुठे?काही वर्षांपूर्वी गुन्हेवारी वृत्तीवर वॉच ठेवण्याकरिता चार्ली पथके तयार करण्यात आली होती. शहरातील विविध भागात ही पथके गस्त घालत होती. ही पथकेही सद्यस्थितीत गुंडाळण्यात आली आहे. यामुळे असामाजिक प्रवृत्तीने डोके वर काढले आहे. पोलीस प्रशासनाचा धाकच राहिलेला नसल्याने बॅचलर रोड परिसरात अनुचित घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी