शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

पांढरे सोने करणार मालामाल; २.१५ लाख हेक्टरवर होणार लागवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

सध्या कापसाला जास्तीत जास्त १२ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. एकूणच दोन ग्रॅम पिवळ्या सोन्याच्या बरोबरीनेच सध्या कापसाला भाव मिळत असून, यंदाच्या खरीप हंगामात २.१५ हेक्टर जमिनीवर कपाशीची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे निसर्गाची साथ राहिल्यास पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल करेल, असा अंदाज वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून व्यक्त केला  जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पिवळे सोने सध्या प्रतिग्रॅम ५ हजार १००च्या घरात असून, कधी नव्हे तितकी यंदा पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापसाच्या भावात तेजी आल्याचे वास्तव आहे. सध्या कापसाला जास्तीत जास्त १२ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. एकूणच दोन ग्रॅम पिवळ्या सोन्याच्या बरोबरीनेच सध्या कापसाला भाव मिळत असून, यंदाच्या खरीप हंगामात २.१५ हेक्टर जमिनीवर कपाशीची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे निसर्गाची साथ राहिल्यास पांढरे सोने शेतकऱ्यांना मालामाल करेल, असा अंदाज वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून व्यक्त केला  जात आहे.४ लाख ३७ हजार हेक्टरवर होणार खरीप पिकांचा पेरा-   यंदाच्या खरीप हंगामात किमान ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टर जमिनीवर विविध पिकांची लागवड होण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. आर्वी तालुक्यात ४६ हजार ७९५ हेक्टर, आष्टी तालुक्यात २६ हजार ४२५ हेक्टर, देवळी तालुक्यात ५७ हजार ५८० हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात ८१ हजार ४०५ हेक्टर, कारंजा तालुक्यात ४५ हजार ९५० हेक्टर, समुद्रपूर तालुक्यात ७३ हजार ४४० हेक्टर, सेलू तालुक्यात ४६ हजार ७४६ हेक्टर, तर वर्धा तालुक्यात ५८ हजार ८८० हेक्टरवर खरीप पिकांची लागवड होणार असल्याचा अंदाज आहे.

७३,५५० हेक्टरवर होणार तूर लागवड- खरीप हंगामात ७३ हजार ५५० हेक्टर जमिनीवर तूर पिकाची लागवड होणार आहे. आर्वी तालुक्यात १०,७५० हेक्टर, आष्टी तालुक्यात ४ हजार हेक्टर, देवळी तालुक्यात ११ हजार हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात १५,५०० हेक्टर, कारंजा तालुक्यात ८,५०० हेक्टर, समुद्रपूर तालुक्यात ८ हजार हेक्टर, सेलू तालुक्यात ५ हजार ३०० हेक्टर, तर वर्धा तालुक्यात १० हजार ५०० हेक्टरवर यंदा तुरीची लागवड होणार आहे.

९० मेट्रीक टन खताची राहणार गरज-    विविध पिकांसाठी जिल्ह्याला ९० हजार मेट्रीक टन इतकी खतांची आवश्यकता भासणार आहे. खतांचा पुरवठा करताना आधी तो ग्रामीण भाग व रॅक पॉईंट पासून लांब असणाऱ्या गावांना करण्यात येणार आहे. -    प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे खतांचा पुरवठा न केल्यास किंवा परस्पर पुरवठा कमी जास्त केल्यास वाहतूकदारांवर अत्यावश्यक वस्तु कायाद्यांतर्गत कार्यवाही करण्यात येणार आहे.

यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण किमान ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होण्याची शक्यता आहे. यात सर्वाधिक क्षेत्र कापसाचे तर त्याच्या पाठोपाठ सोयाबीन पिकाचे क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही गैरसोईला सामोरे जावे लागू नये अशा पद्धतीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. शिवाय भरारी पथक सज्ज राहणार आहेत.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी, वर्धा.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे या उद्देशाने शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे व खत कोंडीला सामोरे जावे लागू नये अशा नियोजनाच्या आपण सूचना दिल्या आहेत.- प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :cottonकापूसMarket Yardमार्केट यार्ड