शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

पांढरे सोने निकषात बसलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 21:12 IST

खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकरी ज्वारी, सोयाबीन, तूर आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतात. अनेक कपाशी उत्पादकांनी यंदा विम्याचे कवच घेतले होते. शिवाय काही कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानही झाले.

ठळक मुद्देपीक विम्याचे वास्तव : ८१० नुकसानग्रस्तांना ४२.९४ लाख

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकरी ज्वारी, सोयाबीन, तूर आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतात. अनेक कपाशी उत्पादकांनी यंदा विम्याचे कवच घेतले होते. शिवाय काही कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानही झाले. असे असले तरी विम्याचे कवच घेतलेल्या नुकसानग्रस्त कपाशी उत्पादकांचे झालेले नुकसान उंबरठा उत्पन्ना पेक्षा कमी उत्पन्न या निकषात बसलेच नाही. परिणामी एकाही कपाशी उत्पादकाला झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपनीने आर्थिक मदत दिलेली नाही.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती हा व्यवसाय तोट्यात आला आहे. अशातच प्रत्येक शेतकऱ्याने शेती करताना पीक विम्याचे कवच घ्यावे असे कृषी तज्ज्ञ सांगतात. २०१८-१९ या आर्थिक वर्षातील खरीप हंगामात ३७ हजार २८८ शेतकऱ्यांनी पीक विम्याचे कवच घेतले होते. त्यापैकी उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न या निकषावर जिल्ह्यातील ८१० नुकसानग्रस्त शेतकरी पीक विम्याच्या नुकसानभरपाई पोटी मिळणाऱ्या रक्कमेसाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना बँक खात्यात लवकरच एकूण ४२ लाख ९४ हजार ९७९ रुपयांची रक्कम वळती केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह कृषी विभागाच्या आवाहनाला केंद्रस्थानी ठेऊन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील खरीप हंगामात जिल्ह्यातील एकूण ३७ हजार २८८ शेतकऱ्यांनी पीक विम्याचे कवच घेतले. सदर शेतकºयांना १६८ कोटी ७७ लाख ९८ हजार ६९७ रुपयांपर्यंच्या नुकसानीचे कवच देण्यात आले होते. हंगामाच्या शेवटी कृषी विभागाच्या सर्वेक्षणाअंती उंबरठा उत्पन्ना पेक्षा कमी उत्पन्न या निकषाच्या आधारावर नुकसानग्रस्त ८१० शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले. त्यांना एकूण ४२ लाख ९४ हजार ९७९ रुपयांची रक्कम विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.व्यक्तिगत नुकसानीचे नऊ अर्जखरीप हंगामात व्यक्तीगत नुकसान झाल्याच्या एकूण ९ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या आहेत. सदर तक्रारी कृषी विभागाने पंचनामा करून विमा कंपनीकडे पाठविल्या आहेत. या नुकसानग्रस्तांना नुकसानीपोटी मिळणारी रक्कम अद्यापही निश्चित झाली नसून लवकरच ही आणि इतर प्रक्रिया पूर्ण करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मोबदला देण्यात येणार आहे. यात देवळी व हिंगणघाट येथील नुकसानग्रांचा समावेश आहे.लीड बँकेकडे वळती झाली रक्कमाुकसानग्रस्त ८१० शेतकºयांना नुकसानीपोटी द्यावयाची रक्कम विमा कंपनीने लीड बँकेकडे वळती केली आहे. लीड बँक आता ही रक्कम इतर बँकेकडे वळती करणार असून सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात नुकसानभरपाई पोटीची रक्कम टाकली जाणार आहे.रबीत २,२०० शेतकऱ्यांनी घेतले विमा कवचखरीप हंगामात ३७ हजार २८८ शेतकºयांनी पीक विमा काढला होता. तर रबी हंगामात २ हजार २०० शेतकºयांनी पीक विम्याचे कवच घेतले होते.उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न या निकषावरून विमा कंपनीने ८१० शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानभरपाईपोटी ४२ लाख ९४ हजार ९७९ रुपये देण्याचे निश्चित केले आहे. शिवाय ही रक्कम लिड बँकेकडे वळती केली आहे.- विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वर्धा.

टॅग्स :cottonकापूस