शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्वप्न कधी पूर्ण होणार? उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदने

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 17:30 IST

विद्यार्थ्यांचा सवाल: शैक्षणिक क्षेत्रात आर्वी परिसर मागासलेलाच

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : येथील देऊरवाडा मार्गावर २० एकरांत जिल्ह्यातील एकमेव असलेले शासकीय तंत्रनिकेतन आहे. विद्यार्थ्यांचा ओढा शासकीय तंत्रनिकेतनकडे आहे. तंत्रनिकेतन उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीसाठी मात्र परजिल्ह्यांत जावे लागते. त्यामुळे विद्यार्थी, पालकांची अडचण होते. त्यामुळे येथे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्वप्न कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आहे.

येथे शासकीय जागा व सुविधा उपलब्ध आहे. अनेक वर्षांपासून अभियांत्रिकी महाविद्यालयाची मागणी आहे. पालक व विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन आमदार दादाराव केचे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदने दिले होते. त्यांनी यावर तातडीने निर्णय घेऊन या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. मात्र, शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही कशाचाच पत्ता नाही.

त्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्वप्न स्वप्नच राहील का?, असा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तालुक्यात एकमेव शासकीय तंत्रनिकेतन सोडले, तर शैक्षणिक बाबींची मोठी वानवा आहे. कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय आहे. मात्र, वेगळे असे कोणतेही तांत्रिक, संगणकीय व इतर प्रशासकीय शिक्षण नाही. त्यामुळे पारंपरिक शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आदी ठिकाणी जावे लागते. विभागात एकही मोठा कारखाना, उद्योग, एमआयडीसी नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे. याकडे लक्ष देऊन पाठपुरावा करणार कोण?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गरीब, गरजू विद्यार्थ्यांना होईल लाभयेथे अभियांत्रिकी महाविद्यालय होणार, अशी चर्चा असल्याने विद्यार्थ्यांना खूप समाधान वाटले. सध्या तंत्रनिकेतन उत्तीर्ण झाल्यावर बीई करण्यासाठी बाहेर जिल्ह्यात जावे लागते. आई, वडील शेतकरी असून, बाहेर ठिकाणी राहण्याचा व इतर खर्च परवडणार नाही. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे झाल्यास अनेक गरीब, गरजू मुली, मुले यांना लाभ हाईल, असे मत तंत्रनिकेतनची विद्यार्थिनी तन्वी केणे हिने व्यक्त केले. 

टॅग्स :wardha-acवर्धा