शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

वीज कधी जाणार, कधी येणार; आता मोबाइलवरच येणार मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 18:30 IST

Wardha : मोबाइलवर मिळणार वीजबिल, तक्रारींचं उत्तर आणि नवीन जोडणीची माहिती!

वर्धा :वीजपुरवठ्यासंबंधी माहितीसाठी महावितरण कार्यालयात हेलपाटे मारणे किंवा फोन करण्याची आता आवश्यकता नाही. महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुमच्यासाठी सोप्या आणि जलद सुविधा उपलब्ध केल्या आहेत. 'महावितरण मोबाइल अॅप' आणि 'ऊर्जा' चॅटबॉट'च्या मदतीने तुम्ही आता घरबसल्या तुमच्या विजेच्या सर्व समस्या आणि प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता.

महावितरणचे अॅप, हेल्पलाइनचीही सुविधामहावितरण मोबाइल अॅप : हे अॅप गुगल प्ले स्टोअर्स आणि अॅपल अॅप स्टोअर्सवर उपलब्ध आहे. यावर तुम्हाला आवश्यक माहिती, तक्रार नोंदणी आणि इतर अनेक सुविधा मिळतील. 'ऊर्जा' चॅटबॉट : हा चॅटबॉट २४/७ उपलब्ध असून, तो तुम्हाला नवीन वीजजोडणी अर्जाची सद्यःस्थिती, वीज बिल भरणे, वीज बिलाचा तपशील, मोबाइल क्रमांक आणि ई-मेल नोंदणी, स्वतः मीटर रीडिंग सबमिट करणे, गो-ग्रीन नोंदणी, वीज वापर आणि बिलाचे कॅल्क्युलेटर अशा अनेक गोष्टींमध्ये थेट मदत करेल. महावितरण संकेतस्थळ या (www.mahadiscom.in): संकेतस्थळावर तुम्हाला सर्व माहिती सविस्तरपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

महावितरण कॉल सेंटर :वीजपुरवठा, वीज देयक आणि इतर तक्रारींसाठी महावितरणचे २४/७कॉल सेंटर सदैव सेवेत आहे. तुम्ही १९१२/१९१२०/१८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या क्रमांकांवर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.

मोबाइल नंबरची नोंदणी कशी करायचीग्राहकाला महावितरणकडे त्याचा मोबाइल क्रमांकाची नोंदणी करणे किंवा तो बदलणे खूप सोपे आहे. यासाठी 'MPEG <१२ अंकी ग्राहक क्रमांक > असा एसएमएस ९९३०३९९३०३ क्रमांकावर एसएमएस पाठवा, किंवा संकेतस्थळावरून किंवा मोबाइल अॅपवरूनही क्रमांक नोंदवू शकता. 

जिल्ह्यातील ग्राहकांचे नंबर नोंदमहावितरण कंपनीने सुरू केलेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ज्यांना विजेसंबंधात माहिती हवी त्यांचा मोबाइल क्रमांक महावितरणच्या अॅपवर नोंदविणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हाच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे.

या गोष्टींची माहिती एसएमएसवरपावसाळ्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होणे, खांब पडणे किंवा तारा तुटणे, अशा समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवतात. अशा वेळी नेमकी काय समस्या आहे आणि ती कुठे आहे, याची माहिती ग्राहकांना पटकन मिळत नाही. याच गोष्टी लक्षात घेऊन महावितरणने हे नवीन उपक्रम सुरू केले आहेत. या अॅप आणि चॅटबॉटमुळे तुम्हाला विजेच्या बिलाची माहिती, बिल भरणा, तक्रारी नोंदवणे आणि नवीन वीजजोडणीची माहिती एका क्लिकवर मिळेल. 

टॅग्स :wardha-acवर्धाelectricityवीज