शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

१२.७४ लाख खड्ड्यांत रोपटे केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:10 IST

सुंदर व हरित वर्धा पर्यायानेच हरित महाराष्ट्र हा हेतू केंद्रस्थानी ठेवून यंदा तिसऱ्यांदा जिल्ह्यासह राज्यात वृक्ष लागवड उपक्रम राबविल्या जात आहे.

ठळक मुद्दे१३ कोटी वृक्ष लागवड उपक्रम : हरित वर्धेकडे अनेकांची पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुंदर व हरित वर्धा पर्यायानेच हरित महाराष्ट्र हा हेतू केंद्रस्थानी ठेवून यंदा तिसऱ्यांदा जिल्ह्यासह राज्यात वृक्ष लागवड उपक्रम राबविल्या जात आहे. १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी जून महिन्यात अनेक ठिकाणी खड्डे खोदल्यानंतर १ जुलैपासून सदर खड्ड्यांमध्ये रोपटी लावली जात आहेत. गत अकरा दिवसांमध्ये केवळ १२.२५ लाख रोपटी जिल्ह्यात लावण्यात आली असून १२.७४ लाख खड्ड्यांना रोपट्यांची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील विविध विभाग हरित वर्धेच्या उद्देशाकडे पाठ दाखवित असल्याने वरिष्ठांनी वेळीच योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.वन व अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वर्धा व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकत्त्व आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात यंदा १३ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविल्या जात आहे. १३ कोटी वृक्ष लागवडीचा एक भाग म्हणून वर्धा जिल्ह्याला २६ लाख रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. जून महिन्यात वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील विविध विभागाकडून ठिकठिकाणी खड्डे खोदल्यानंतर १ जुलैपासून त्या खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड केली जात आहे. जुलैच्या दुसºया आठवड्यापर्यंत वृक्ष लागवडीचे काम सुमारे ७५ टक्के पूर्ण होईल असा अंदाज वन विभागासह जिल्हा प्रशासनाला होता; पण ११ जुलैपर्यंत प्रत्यक्षात १२ लाख २५ हजार ६१५ रोपटे लावण्यात आल्याची नोंद घेण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्याला प्राप्त उद्दीष्ट वेळीच पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील विविध विभाग पाहिजे तसे सहकार्य करीत नसल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.वृक्षारोपणात ग्रा.पं. व न.प.सह कृषी विभाग मागेचजिल्ह्यातील कृषी विभागाला ३ लाख १२ हजार ६२५, ग्रामपंचायतींना ६ लाख २९ हजार ८८० तर नगरपंचायत तसेच नगर पालिकांना २० हजार ६७५ रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. परंतु, प्रत्यक्षात आतापर्यंत कृषी विभागाने केवळ २ हजार ४९३, ग्रामपंचायतींना २ हजार ७६४ तर नगरपंचायत तसेच नगर पालिकांनी केवळ ७५ रोपटे लावल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे सदर विभाग जिल्ह्यात वृक्ष लागवडीत मागेच असल्याचे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.केवळ एकच व्हिडीओ केला अपलोडड्रोन कॅमेºयाच्या माध्यमातून जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे सर्वेक्षण केले जात आहे. सदर सर्वेक्षण करताना काही छायाचित्रे टिपत जास्तीत जास्त एक मिनीटांचा व्हिडीओ तयार करून तो राज्य शासनाने वृक्ष लागवड उपक्रमासाठी तयार केलेल्या राज्य शासनाच्या वेबसाईडवर अपलोड करणे क्रमप्राप्त आहे. असे असले तरी गत अकरा दिवसांच्या कालावधीत केवळ एकच व्हिडीओ सदर वेबसाईडवर वर्धा जिल्हा प्रशासनाने अपलोड केल्याचे सांगण्यात येते.ड्रोन कॅमेºयाच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या वृक्षरोपणाचा सर्वे करून त्याची माहिती वरिष्ठांना पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग