शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

मोहता मिलची चाके थांबली साडेसहाशे कामगार वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 06:00 IST

वीस वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याच्या उद्देशाने मोहता ग्रुपने विविध षडयंत्र रचले. याच्या विरोधात कामगारांनी आवाजही उठविला पण, शुक्रवारी सायंकाळी मिल व्यवस्थापनाने जल व वायु प्रदुषणाचे कारण पुढे करुन मिलमधील विद्युत व पाणीपुरवठा खंडीत करुन मिलचे कामकाज बंद केले आहे.

ठळक मुद्देविद्युत व पाणीपुरवठा खंडीत । कामगारांनी पालकमंत्र्यांकडे मांडल्या व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या मोहता मिलच्या कामगारांना मागील काही दिवसांपासून व्यवस्थापनाकडून सहकार्य केले जात नव्हते.वीस वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याच्या उद्देशाने मोहता ग्रुपने विविध षडयंत्र रचले. याच्या विरोधात कामगारांनी आवाजही उठविला पण, शुक्रवारी सायंकाळी मिल व्यवस्थापनाने जल व वायु प्रदुषणाचे कारण पुढे करुन मिलमधील विद्युत व पाणीपुरवठा खंडीत करुन मिलचे कामकाज बंद केले आहे. त्यामुळे आयुष्याच्या उमेदीचा काळ मिलमध्ये घालविणाऱ्या साडेसहाशे कर्मचाऱ्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.हिंगणघाट येथील मोहता ग्रुपने १२५ वर्षाच्या कार्यकाळात या मिलमध्ये व्हिविंग अ‍ॅण्ड स्पिनिंग, प्रोसेसिंग युनिट सुरू आहे. मेलमध्ये ३ शिफ्ट कामगार काम करतात. या मिलमध्ये १२०० ते १३०० कामगार २०१५ पर्यंत काम करीत होते. तसेच ठेकेदारी मध्ये जवळपास २०० कामगार काम करीत होते. या कामगारांच्या भरोशावर मोठी प्रगती साधली. या ग्रुपने हिगणघाट व वणी येथे गिमाटेक्स, जांब येथे पी.व्ही.टेक्सटाईल व बुरकोनी येथे आर.एस.आर.मोहता मिल्स, अशा मोठ्या कंपन्या उभारल्या. या सर्व कंपन्या अद्यावत असून चांगल्या प्रकारे सुरुही आहे. मात्र, मोहता मिलमध्ये वीस वर्षांपासून काम करणाºया कामगारांना व्यवस्थापनाने कायम केले नाही. ०१ मार्च २०१७ पासून मोहता मिलच्या व्यवस्थापनाने कपडा खाता बंद केला. त्यामुळे कामगारांसमोरील अडचणींचा फास आवळल्या गेला. मागील सहा महिन्यांपासून प्रोसस व फोल्डींग विभागातील कामगारांना जाणीवपूर्वक काम देणे बंद केले. तसेच अन्य खात्यात सुद्धा काप्लीमेंटनुसार कामही दिले नाही. तसेच दोन महिन्यांपासून कामगारांचे वेतन सुद्धा वेळेवर दिले नाही. कामगारांना ले-ऑफ देण्यात येते परंतु कामगारांना ले-आॅफचा पगार देण्यात येत नाही. तसेच बदली कामगारांना रिटर्न देण्यात येते मात्र ते रिटर्नचा मोबदला देत नाही, अशा अनेक समस्या या व्यवस्थापनाने कामगारांपुढे उभ्या करुन त्यांचे खच्चिकरण सुरु केले. याच्या विरोधात कामगारांनी कामगार संघटनेच्या माध्यमातून मागण्या शासन दरबारी मांडल्या परंतु त्यांना यश आले नाही. अखेर शनिवारी जल व वायु प्रदुषणाच्या नावाने मिलचा विद्युत व पाणीपुरवठा खंडीत केला. याची माहिती पहिल्या पाळीतील कामगारांना मिळाल्यावर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे मिलमधील साडेसहाशे कामगारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे.कामगारांची जनसंवाद कार्यक्रमात धडकपहिल्या पाळीतील कामगार नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी मिलमध्ये गेले असता मिलच्या मुख्यव्दाराच्या बाजुला असलेल्या सूचना फलकावर मिलव्दारे जल व वायुप्रदुषण वाढत असल्याने या मिलचा विद्युत आणि पाणीपुरवठा खंडीत करण्यात आल्याची माहिली लावलेली होती. यावरुन या मिल व्यवस्थापनाने कामबंद केल्याचे कामगारांच्या लक्षात येताच सर्व कामगार एकत्र आले. दरम्यान, वर्धेच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनसंवाद कार्यक्रम असल्याची माहिती मिळाल्याने सर्व कामगारांनी जनसंवाद कार्यक्रमात धडक दिली. यावेळी मिल व्यवस्थापकाकडून कामगारांच्या होणाऱ्या शोषणाबाबत माहिती देऊन कामगारांच्या संमस्या सोडविण्याची मागणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.