लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: निसर्ग कधी काय चमत्कार करेल हे सांगता येत नाही. वर्धा जिल्ह्यातील सेलू गावात राहणाऱ्या प्रल्हाद मांढरे यांच्या घरी पाळलेल्या कोंबडीने चक्क काकडीच्या आकाराचे अंडे दिले असून अवघे गाव त्याविषयीच्या चर्चेत बुडाले आहे.कोंबडीच्या अंड्याचा लंबगोल आकार पाहण्याची सवय असलेल्या मांढरे यांना शुक्रवारी आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्या घरातील कोंबडीने दिलेले अंडे एका काकडीच्या आकारासारखे दिसत होते. ही बाब पाहता पाहता गावात पसरली. गावकरी ते अंडे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने जमू लागले व पाहून जाऊ लागले.. असा प्रकार कधीही पाहिला नसल्याचे गावातील वयोवृद्ध नागरिकांचे म्हणणे होते. आता हे अंडे कोंबडी उबवते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अहो आश्चर्यम्! कोंबडीने दिले काकडीच्या आकाराचे अंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 13:24 IST