शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरी धोकादायक

By admin | Updated: May 22, 2014 01:22 IST

आष्टी-परसोडी ते खडकी या ग्रामीण मार्गावर दोन विहिरी ऐन डांबरी रस्त्याला लागून आहे.

आष्टी (श.) : आष्टी-परसोडी ते खडकी या ग्रामीण मार्गावर दोन विहिरी ऐन डांबरी रस्त्याला लागून आहे. वाहतुकीचा रस्ता असल्याने या ठिकाणी अनेक अपघात झालेत. सदर दोन्ही विहिरी गत अनेक वर्षापासून तशाच पडून आहेत. या विहिरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असल्याने बांधकाम विभागाने दोन्ही विहिरी त्वरित बुजवाव्यात, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

येथील शेतकरी धनराज गुल्हाणे यांची आष्टी-परसोडा रस्त्यावर शेती आहे. शेताच्या एका बाजूचा धुरा रस्त्याच्या दिशेने आहे. याच ठिकाणी दोन विहिरी एकमेकांना लागून आहेत. या विहिरी बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या हद्दीत आहेत. विहिरीची लांबी ७0 फूट खोल तर रूंदी १२ फूट असून दुसरी विहीर १00 फूट खोल तर रूंदी १८ फुटाची आहे. दोन्ही विहिरीत पाणी असल्याने अपघात झाल्यावर अनेक जीव जातात. सद्यस्थितीत विहिरीच्या सभोवताल काटेरी संरक्षण ठेवण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी कुणालाही दिसत नसल्याने हमखास अपघात होतो. दोन्ही विहिरी बुजवून पावसाळ्यातील पाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांची आवश्यकता आहे. सदर विहिरी सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप बुजविण्यात आल्या नाहीत. यामुळे प्रवाशांच्या जीविताचा बांधकाम विभागाने खेळ चालविल्याचा आरोप शेतकर्‍यांनी निवेदनातून केला आहे. याच रस्त्यावर आष्टीजवळ लेंडी नदीवर पूल आहे. पुलाजवळील नदीचे पात्र बुजल्याने पाणी पुलावरून वाहते. पावसाळ्यात प्रवासी, शेतात ये-जा करणारे शेतकरी, मजूर यांच्याकरिता पुलावरून वाहणारे पाणी डोकेदुखी ठरते. सदर पुलाच्या भोवताल साचलेले ढिगारे काढून नदीचे पात्र खोल करण्याची मागणी करण्यात आली आहे; पण याकडेही कुणी लक्ष देण्यास तयार नाही.

रस्ता व इमारती बांधकामावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; पण आवश्यक कामे केली जात नाहीत. संबंधितांनी लक्ष देत दोन्ही विहिरी त्वरित बुजविण्यात याव्यात, अशी मागणीही शेतकर्‍यांनी केली आहे.(प्रतिनिधी)