शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगार योजना मंडळासाठीच ‘कल्याणकारी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 03:07 IST

कंत्राटदारांचं चांगभलं : आधी वाटल्या पेट्या; आता वाटणार आहेत ताटवाट्या

- आनंद इंगोलेवर्धा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना वर्षभरापूर्वी सुरक्षा किट असलेल्या लोखंडी पेट्यांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर आता ताटवाट्यांसह गृहोपयोगी वस्तूंचा संच वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वितरित केलेल्या पेट्यांची बाजारातील किंमत आणि मंडळाकडून कंत्राटदाराला दिलेल्या देयकातील किंमत यात मोठी तफावत दिसून आली आहे. हाच प्रकार आता गृहोपयोगी वस्तूंच्या वाटपातही होण्याची शक्यता असून, या योजना कामगारांपेक्षा मंडळ आणि कंत्राटदारांसाठीच ‘कल्याणकारी’ ठरत असल्याची ओरड होत आहे.गेल्या वर्षी राज्यभरात जवळपास २३ लाख कामगारांना तालुकास्थळी शिबीर लावून पेट्यांचे वितरण करण्यात आले. या पेटीतील साहित्याची बाजारातील किंमत चार ते पाच हजार रुपये आहे. परंतु, कंत्राटदाराला प्रतिपेटी १४ हजार रुपयांप्रमाणे देयक अदा केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेचेही खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. राज्यभरात केवळ १० लाख कामगारांचेच नूतनीकरण झाले. नूतनीकरण केल्यानंतर मिळणाऱ्या ओळखपत्राची बाजारातील किंमत पंधरा रुपये असताना त्यासाठी २५ रुपये दिले जात आहेत. आता गृहोपयोगी वस्तूंचा संच देण्याचे कंत्राट पेटी पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारालाच दिले जाण्याची शक्यता आहे. नागपूरस्थित या कंत्राटदाराचे मंत्रालयापर्यंत कनेक्शन असल्याचे सांगण्यात येते.गृहोपयोगी वस्तू संचात काय मिळणार?गृहोपयोगी वस्तू संचात चार ताटे, आठ वाट्या, पाण्याचे चार ग्लास, तीन पातेली झाकणासह, दोन मोठे चमचे, एक पाण्याचा जग, सात भाग असलेला एक मसाला डबा, झाकणांसह तीन डबे, एक परात, कुकर, कढई आणि स्टीलची टाकी झाकणासह या वस्तुंचा समावेश आहे. कामगारांसाठीचे निर्णय आणि सद्यस्थिती घर बांधण्याकरिता प्रत्येकी दोन लाख रुपये. - तीन वर्षांत एकाही कामगाराला लाभ मिळाला नाही.  मुलीच्या विवाहासाठी ५० हजार रुपये. - शासनाने अद्यापही मंजुरी दिली नाही.