शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

आठवडी बाजार भरतो रस्त्यावर

By admin | Updated: May 27, 2017 00:34 IST

प्रत्येक मंगळवारी येथे आठवडी बाजार भरतो. पंचक्रोशीतील शेतकरी-शेतमजूर येथे विविध साहित्य खरेदीसाठी येतात;

नेहमीच होते वाहतुकीची कोंडी : दुर्गंधीचा नागरिकांना सोसावा लागतो त्रास लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : प्रत्येक मंगळवारी येथे आठवडी बाजार भरतो. पंचक्रोशीतील शेतकरी-शेतमजूर येथे विविध साहित्य खरेदीसाठी येतात; पण काही छोटे व्यावसायिक थेट वर्धा-नागपूर मार्गावरील जुन्यापुलाजवळ दुकाने थाटत असल्याने येथे वाहतुकीची कोंडी होते. कचरा रस्त्याच्या कडेला टाकल्या जात असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देत योग्य कार्यवाहीची मागणी आहे. ग्रा.पं. असताना बाजार विकास योजनेंतर्गत दुकानासाठी ओटे बणविण्यात आले. पण, काही छोटे व्यावसायिक मुख्य रस्त्यावर बसत असल्याने वाहतूक खोळंबते. बाजार संपल्यावर सडका भाजीपाला रस्त्यावर टाकल्या जातो. त्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. विनाकठड्याच्या पुलामुळे अपघाताची भीती आठवडी बाजार येथे रस्त्यावर भरतो. तेथे बोरनदीवरील जुना पुल आहे. त्याला सुरक्षा कठडे नाही. गर्दी पुलापर्यंत असते व लोकांची ये-जा याच पुलावरुन असल्याने अपघाताची भीती बळावत आहे. आता आठवडी बाजारापेक्षाही मोठा जुन्या पुलावर भरू लागला आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता योग्य कार्यवाहीची गरज आहे. नियमांना डावलून वसूली सुरू आठवडी बाजार कर वसूलीचा ठेका देण्यात आला आहे. बाजारात बसणाऱ्या दुकानदाराकडून कर घेणे क्रमप्राप्त असताना मेडिकल चौकातही त्या दिवशी छोट्या व्यावसायिकांकडून कर वसूल केल्या जात असल्याची तक्रार आहे. पण नगर पंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. नगरपंचायतीद्वारे या बाजाराचा कर वसुल करण्याचा वार्षिक ठेका दिल्या जातो. कर वसूल करणारे अरेरावी करीत मनमर्जीने कर वसूल करून दमदाटी करीत असल्याचे छोटे व्यावसायिक सांगतात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.