शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुलगाव शहराला झुकते माप देवून स्मार्ट सिटी बनवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:56 IST

आम्ही जनतेवर विश्वास ठेवतो. विश्वास हा विकासाचा केंद्रबिंदू आहे. जनतेची आमच्यावर विश्वास ठेवला राज्यात व केंद्रात आम्हाला सत्ता दिली म्हणूनच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात विविध योजना कार्यान्वीत करून त्याची अंमलबजावणी करीत आहे.

ठळक मुद्देरणजीत पाटील : २० महिन्यांतील कामांचा शुभारंभ कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : आम्ही जनतेवर विश्वास ठेवतो. विश्वास हा विकासाचा केंद्रबिंदू आहे. जनतेची आमच्यावर विश्वास ठेवला राज्यात व केंद्रात आम्हाला सत्ता दिली म्हणूनच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात विविध योजना कार्यान्वीत करून त्याची अंमलबजावणी करीत आहे. पुलगाव येथील नागरिकांनी आमच्यावर विश्वास टाकून येथील सत्ता दिल्यास आम्ही पुलगाव शहराला झुकते माप देत या शहराला स्मार्ट सिटी बनऊ, असे आश्वासन राज्याचे नगर विकास निधी, न्याय कौशल्यविकास गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिले.स्थानीय नगर परिषदेने मागील २० महिन्यात केलेल्या विकास कामाचा शुभारंभ व नवीन कामांचा श्रीगणेशा ना. रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शीतल गाते तर प्रमुख अतिथी म्हणून खा. रामदास तडस, आ. डॉ. रामदास आंबटकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, माजी खासदार सुरेश वाघमारे, जि.प.चे माजी सभापती मिलिंद भेंडे, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, महाराष्ट्र ओबीसी मंडळाने सरचिटणीस संजय गाते, भाजपा शहराध्यक्ष मंगेश झाडे, जिल्हा सचिव नितीन बडगे, कपील शुक्ला यांची उपस्थिती होती.खा. तडस म्हणाले, नगर परिषद म्हणजे स्थानिक विकासाचा रथ आहे. नगरसेवक, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी हे या रथाची चाके व त्यांच्यातील कल्पक विचार हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या रथाचा सारथी असतो. या सर्वांचा योग्य समन्वय असला तरच शहर विकासाचा रथ व्यवस्थित चालतो. मागील सहा दशकात या भागात काही अपवाद वगळता काँग्रेसची सत्ता राहिली. मात्र, या काळात शहराचा विकास करण्याऐवजी आपलाच विकास केल्या गेल्याची बोचरी टिका खा. तडस यांनी विरोधकांवर केली.यंदा पुलगाव येथील नागरिकांनी या नगर परिषदेवर भाजपाला सत्ता दिली. म्हणून आम्ही विकासाचा केंद्र हे गाव ठरविले. या शहराला सर्व बाजूने राष्ट्रीय महामार्गाने जोडण्याचा, क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात या शहराचा नावलौकि व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे. पुलगाव, नाचणगाव या मार्गाचे चौपदरीकरणाची मागणीही ना. पाटील यांच्याकडे खा. तडस यांनी केली. याप्रसंगी आ. डॉ. रामदास आंबटकर, जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांनीही मार्गदर्शन केले.उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरवकार्यक्रमादम्यान नगर परिषदेच्यावतीने मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तर मान्यवरांच्या हस्ते पुलगाव शहराच्या विकास कामात मोलाचे योगदान दिल्याबद्दल नगरसेविका मतता बडगे, नितीन बडगे व मुख्याध्यापक विठ्ठल वानखेडे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शहरातील गणमान्य व्यक्तींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस