आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘रोजगाराच्या शोधात जिल्ह्याच्या किवा राज्याच्या सीमा ओलांडून आलेल्यांना लॉकडाऊनमुळे परतीचा मार्ग बंद झाला. हातचे काम गेल्याने गाठीला पैसा शिल्लक नाही, अशा परिस्थितीत आम्ही परावलंबी झालो. आज मुलाबाळांचा सांभाळ करायचा कसा, हा प्रश्न असतानाच वर्धातील महात्मा गांधीजींच्या या भूमीत जिल्हा प्रशासनाकडून निवारा मिळाला तर विविध स्वयंसेवी संस्थांनी घरच्या सारखा सांभाळ केला.’ असे अनुभव निवारागृहात आश्रयास असलेल्या कामगारांनी व्यक्त केले.जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ६१ निवारागृहात ८ हजार १८३ मजुरांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये काही वर्ध्यात कामाकरिता आलेले मजूर असून काही परीक्षा देण्याकरिता आलेले विद्यार्थीही आहेत. आता गेल्या दीड महिन्यांपासून हे सर्व विविध ठिकाणच्या निवारागृहात वास्तव्यास असून त्यांच्या भोजनाची, कपड्याची व नित्य उपयोगातील साहित्यांची स्वयंसेवी संस्थांकडून पूर्तता केली जात आहे. त्यामुळे निवारागृहातील कामगार आणि जबाबदारी स्वीकारलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एक नाते तयार झाले असून परिवारासारखाच सांभाळ केल्या जात आहे. त्यामुळे आपल्या गावाकडे जाणाºया कामगारांनी आपल्या अश्रुवाटे भावनांना वाट मोकळी करुन देत ‘साहाब...आपने माता-पिता जैसा खयाल रखा’ अशी कृतज्ञताही व्यक्त केली आहे. उर्वरीत वृत्त/२संकटकाळात सेवारत स्वयंसेवी संस्थाकोविड-१९ च्या संकटकाळात लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांची व्यवस्था करण्याकरिता जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था अहोरात्र नि:स्वार्थीवृत्तीने सेवा देत असल्याने प्रशासनाचा आर्थिक भार हलका झाला आहे. यामध्ये गांधी सिटी रोटरी क्बल, वैद्यकीय जनजागृती मंच, अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन, भारतीय माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, ओबीसी जनजागृती संघटना, रोटरॅक्ट क्लब, जिल्हा अन्नदान समिती, संत कवरराम सेवा मंडळ, वर्धा सोशल फोरम, बोहरा समाज, सेवा फाउंडेशन, मेहेर सेवाभावी संस्था, ऑल इंडिया बीएसएफ एक्स सर्विसमेन वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र तक्रार निवारण परिषद, बालाजी मंदिर ट्रस्ट, माहेश्वरी मंडळ, युथ फॉर चेंज, जयहिंद फाउंडेशन, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, युवा सोशल फोरम, मराठा सैनिक वल्फेअर असोसिएशन, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, नॅशनल इस्टिट्यूट ऑफ वुमन चाईल्ड अॅण्ड युथ डेव्हलपमेंट, लॉयन्स क्बब मेन, जिव्हाळा सेवाभावी संस्था, हेल्पिंग हार्ट चॅरिटेबल ट्रस्ट, प्रहार वाहन चालक संघटना, लॉयन्स क्बल ट्रस्ट, वैदर्भीय रेल्वे एम.एस.टी. प्रवासी संघ, जनहित मंच व आयसोशल आदी स्वयंसेवी संस्थांचा समावेश आहे. याशिवायही अनेक संस्था, प्रतिष्ठीत नागरिक व व्यापारी मंडळांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहकार्य केले जात आहे.निवारागृहातून कामगारांचे पलायनवर्धा शहरात दहा निवारागृह तयार करण्यात आले आहे. या दहाही निवारागृहामध्ये ७०३ कामगारांना आश्रय दिला आहे. सर्व ठिकाणी स्वयंसेवी संस्थांकडून या कामगारांची योग्य पद्धतीने देखभाल होत असतांनाही रामनगरस्थित अग्रसेन भवन येथील काही कामगारांमुळे स्थानिक नागरिकांसह प्रशासनालाही मनस्ताप सहन करावा लागला. मनाईनंतरही रात्री रस्त्यावर येऊन बसने, इमारतीच्या स्लॅबवर बसून आरडाओरड करणे, असा प्रकार चालविला होता. त्यानंतर प्रशासनाने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरीही सुरुवातील तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांतील तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन समजाविले. यानंतरही एकाच दिवशी जवळपास २६ कामगारांनी रात्रीतूनच पलायन केले. त्यामुळे आता काही प्रमाणात तेथील त्रास कमी झाला आहे.अनुभव उतरले कागदावरशहरातील न्यू इंग्लिश शाळेतील निवारागृहात जवळपास १०० कामगारांना निवारा देण्यात आला असून त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीने स्वीकारली आहे. या ठिकाणी दररोज शिक्षकांकडून कामगारांची भोजनाची व्यवस्था केली जात आहे. विशेषत: या कामगारांवर ओढवलेल्या या आपत्तकालीन परिस्थितीतील अनुभव त्यांच्याच शब्दात मांडण्याकरिता सर्वांच्या हातात कागद पेन देण्यात आला. कामगारांनीही सहभागी होत कुणी चित्रांच्या माध्यमातून तर कुणी शब्दातून आपल्या भावना व्यक्त केल्यात. महाराष्ट्र दिनी निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली.श्रमदान अन् वृक्षारोपणनवजीवन छात्रालयात ४२ कामगारांसाठी निवारागृहाची व्यवस्था करण्यात आली. याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडे सोपविण्यात आली. येथे उत्तरप्रदेशातील १५, मध्यप्रदेशातील १५, ओरिसा १, पालघर १, अमरावती ६, यवतमाळ २ व चंद्रपूर येथील १ व्यक्ती आश्रयात आहेत. या आश्रितांना कामात गुंतवून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहे. या मजुरांनी नवजीवन छात्रावासाची इमारतीची रंगरंगोटी केली तसेच महाराष्ट्र दिनी ७० रोपट्यांची लागवड करुन आपली एक ओळख निर्माण केली आहे. या ठिकाणी शिक्षकांनीही या कामगारांना घरच्या सारखी वागणूक दिल्याने अनेकांना या संकटाचा विसरही पडला आहे.
कामासाठी आलो, परावलंबी झालो पण; बापूंच्या भूमीत मिळाला आसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST
जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ६१ निवारागृहात ८ हजार १८३ मजुरांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये काही वर्ध्यात कामाकरिता आलेले मजूर असून काही परीक्षा देण्याकरिता आलेले विद्यार्थीही आहेत. आता गेल्या दीड महिन्यांपासून हे सर्व विविध ठिकाणच्या निवारागृहात वास्तव्यास असून त्यांच्या भोजनाची, कपड्याची व नित्य उपयोगातील साहित्यांची स्वयंसेवी संस्थांकडून पूर्तता केली जात आहे.
कामासाठी आलो, परावलंबी झालो पण; बापूंच्या भूमीत मिळाला आसरा
ठळक मुद्देकामगारांच्या व्यथा : प्रशासनाने दिला निवारा अन् स्वयंसेवी संस्थांनी केला सांभाळ