शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यात दोन बालकांना जलसमाधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 21:30 IST

निम्न वर्धा प्रकल्पाच्या मारडा येथील कालव्यात सायकल धुण्याकरिता गेलेल्या दोन बालकांचा बुडून अंत झाला.

रोहणा (वर्धा) :  निम्न वर्धा प्रकल्पाच्या मारडा येथील कालव्यात सायकल धुण्याकरिता गेलेल्या दोन बालकांचा बुडून अंत झाला. ही घटना गुरुवारी रात्री उघड झाली. रितीक अविनाश राऊत (१५) व मयुर विजय पारिसे (१४) रा. मारडा असे बुडून मृत्यू झालेल्या बालकांची नावे असल्याची माहिती आहे. 

पोलीस सुत्रांनुसार, मारडा येथील रितीक राऊत व मयुर पारीसे हे दोघे सायकल धुण्यासाठी गावानजीकच्या निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याकडे  सायंकाळी गेले होते. सायंकाळचे सात वाजले तरी दोघेही घरी परतले नसल्याने आई-वडिलांनी व गावकºयांनी शोधाशोध केली असता गावालगतच्या निम्न वर्धाच्या कालव्याच्या पुलाजवळ मुलांच्या सायकली व चपला दिसल्या. याची माहिती मनोज ज्ञानेश्वर राऊत यांनी पुलगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच हवालदार सूर्यवंशी व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. 

रात्री कालव्यात गावातील पोहण्यात तरबेज असलेल्यांच्या मदतीने मृतदेह शोधण्यात आला. यात दोन्ही मुलांचे मृतदेह मिळून आला. घटनास्थळाचा पंचनामा करून मृदतदेह पुलगाव येथील शवविच्छेदनगृहात पाढविण्यात आले. 

दोन्ही मुले मॉडेल हायस्कूल रोहणाचे विद्यार्थी असून रितीक हा वर्ग नववी तर मयुर हा वर्ग आठवीमध्ये शिकत होता. रखरखत्या उन्हामुळे वर्धा नदी व कालवा कोरडा होता पण पाणी टंचाईची तिव्रता कमी व्हावी म्हणून नुकतेच निम्न वर्धा प्रकल्पातील पाणी वर्धा नदीच्या पात्रात व कालव्यात सोडण्यात आले होते. तपास पुलगावचे ठाणेदार मुरलीधर बुरांडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.