लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : अण्णासागर तलावामध्ये जलसाठा वाढावा यासाठी पाण्याचे स्रोत वळविण्यात आले; पण एका दिशेने बांधी फुटल्याने पाणी चक्क शेताच्या दिशेने वाहून गेलेले आहे.सेवाग्रामसाठी अण्णासागर तलाव आधार ठरला आहे. आज पाण्याची समस्या लक्षात घेतली तर पाणी अडवा पाणी जिरवा यासह आता तर वॉटर हार्वेस्टिंगची गरज प्रकर्षाने जाणवायला लागली आहे. भविष्यात पाणी समस्या तीव्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने या तलावाचे खोलीकरण करून जलसाठा वाढविण्याकरीता उपाययोजना केल्या आहेत.यातील आदर्शनगरच्या खालच्या भागातून मोठी बांदी खोदून पाण्याच्या प्रवाहाला अण्णासागरच्या दिशेने वाट करून देण्यात आली. पण बांदीचा उतार योग्य नसल्याने पाण्याने बांदी फोडून शेताच्या उतार दिशेने पाणी गेले. यात जवळपास तीन शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अण्णा सागरचे खोलीकरण आणि दगडाची पाळ यामुळे तलावाचे मजबुतीकरण झाले. जलसंचय वाढणार यात शंका नाही. यावर्षी पाऊस तसा कमीच झाल्याने तलावात संचय कमीच आहे. जवळच्या विहिरी आणि बोअरवेल साठी फायद्याचे ठरणार असले तरी या तलावाचे सौंदर्यीकरण करून शासनाने चांगले काम केले आहे. वनविभागाने मुख्य रस्ता आणि तलाव यातील मधल्या जागेवर वृक्षारोपण केले असल्याने भविष्यात सुंदर असे रूप या तलावाला प्राप्त होणार आहे.
बांधी फुटल्याने पाणी वळले शेतशिवाराकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 06:00 IST
अण्णा सागरचे खोलीकरण आणि दगडाची पाळ यामुळे तलावाचे मजबुतीकरण झाले. जलसंचय वाढणार यात शंका नाही. यावर्षी पाऊस तसा कमीच झाल्याने तलावात संचय कमीच आहे. जवळच्या विहिरी आणि बोअरवेल साठी फायद्याचे ठरणार असले तरी या तलावाचे सौंदर्यीकरण करून शासनाने चांगले काम केले आहे.
बांधी फुटल्याने पाणी वळले शेतशिवाराकडे
ठळक मुद्देसेवाग्रामातील अण्णासागर तलाव : परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान