शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

टँकरद्वारे पाणी पुरवठा नागरिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 21:52 IST

शहरालगतची सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पिपरी (मेघे) ची ओळख आहे. या ग्रामपंचायत परिसरातील काही भागात यावर्षी पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. नागरिकांची ही समस्या लक्षात घेत ग्रामपंचायतने लोकसहभागतून तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देग्रा.पं. चा पुढाकार : प्रति कुटुंबाला मिळते दोन ड्रम पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतची सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पिपरी (मेघे) ची ओळख आहे. या ग्रामपंचायत परिसरातील काही भागात यावर्षी पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. नागरिकांची ही समस्या लक्षात घेत ग्रामपंचायतने लोकसहभागतून तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.पिपरी (मेघे) ग्रामपंचायतला जीवन प्राधिकरणव्दारे पाणीपुरवठा केल्या जातो. जलाशयाने तळ गाठल्यामुळे नियमित पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याने काही भागात सहाव्या दिवशी तर काही भागात दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. जवळपास ३५ हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील विहिरी व कुपननिकांही कोरड्याठाक झाल्याने काही भागात पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरु आहे. आगामी समस्या लक्षात घेता ग्रामपंचायतने प्रशासनाकडे टँकरची मागणी केली होती. पण, प्रशासनाने टँकर उपलब्ध करुन न दिल्याने शेवटी ग्रामपंचायतनेच लोकसहभागातून तीन टँकर मिळवून पाणी समस्येवर मात केली आहे. दररोज आता टँकरद्वारे पाणी पुरवठा केल्या जात आहे. सोमवारी सकाळपासून सावजीनगर, पेंदाम ले-आऊट, गांजरे ले-आऊट व मालेकर ले-आऊट या परिसरात पाणीपुरवठा करण्यात आला आहे. प्रत्येक कुटूंबाला दोन ड्रम पाणी पुरविले जात आहे. कमी पाणी मिळत असले तरीही नागरिकांचा त्रास वाचल्याचे सांगितले जात आहे.यांनी दिला सहकार्याचा हातग्रामपंचायत पिपरी (मेघे) परिसरातील भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेकडून १२ हजार लिटर क्षमतेचा १ टँकर भेट देण्यात आला.पण, एका टँकरने ही समस्या निकाली निघणारी नसल्यामुळे आमदार डॉ.पंकज भोयर मित्र परिवार आणि सरपंच अजय गौळकर मित्र परिवाराच्यावतीने ५ हजार लिटर क्षमतेचे दोन टँकर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या तिन्ही टँकरच्या सहाय्याने सध्या पाणी पुरवठा सुरु आहे.गावातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. आता पाण्यासाठी नागरिकांची होणारी पायपीट पाहून ग्रामपंचायत प्रशासनाने लोकसहभागातून समस्या निकाली काढण्याचा ठराव घेतला. त्यानुसार तीन टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. प्रति कुटूंबाला दोन ड्रम पाणी यानुसार पाणीपुरवठा सुरु असून नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.-अजय गौळकर, सरपंच, पिपरी (मेघे).