शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:11 IST

शहरालगत बारमाही वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रात यंदा ठणठणाट आहे. जलसंकटावेळी पाणीपुरवठा करणाऱ्या शहरातील मोठ्या विहिरी जमीनदोस्त झाल्यामुळे शहराला सतत पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देपुरवठा सुरळीत करण्याची नगराध्यक्षांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शहरालगत बारमाही वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रात यंदा ठणठणाट आहे. जलसंकटावेळी पाणीपुरवठा करणाऱ्या शहरातील मोठ्या विहिरी जमीनदोस्त झाल्यामुळे शहराला सतत पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.सध्या पाणी टंचाईमुळे अनियमित झालेला पाणीपुरवठा नियमित करण्याच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाने लोअर वर्धा धरणाकडे १५ लाख रूपये जमा केल्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात आले. नागरिकांनी पाणीटंचाई लक्षात सहकार्य केल्यास पूर्ववत पाणीपुरवठा करण्याची ग्वाही नगराध्यक्ष शीतल गाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.शहर व परिसरात दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेता शेकडो कोटी रूपये खर्चाचे पुलगाव बॅरेज बांधून पाणी अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, ठराविक मुदतीत बॅरेजचे काम पूर्ण झाले नाही. भीषण पाणीटंचाईच्या काळात शहराला पाणीपुरवठा करणाºया हरिरामनगर, दयालनगर, गणेशनगर, आठवडी बाजार यासह औद्योगिक प्रशिक्षण संस्था व काही ठिकाणच्या मोठ्या विहिरी जमीनदोस्त करण्यात आल्या. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनावर आहे.पूर्वी पाणीटंचाई नागरिक शहरातील मोठ्या विहिरींच्या पाण्याचा वापर करीत होते. परंतु, आज त्या विहिरी जमीनदोस्त झाल्यामुळे शहरात नळयोजनेच्या पाणी पुरवठ्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. परिणामी मागील काही दिवसात चार-पाच दिवसांआड पाणी पुरवठा सुरू होता. नगर प्रशासनाने लोअर वर्धा प्रशासनाकडे १५ लाख रूपये भरल्यामुळे लोअर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात आले असून शहराचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. याशिवाय पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शहरात विविध वॉर्डात ३४ बोअरवेल करण्यात आल्या असून २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन नगराध्यक्ष गाते यांनी केले आहे.नदीपात्राला कोरडयंदा जिल्ह्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने शहरालगत वाहणाºया वर्धा नदीपात्राला अनेक ठिकाणी कोरड पडली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे. एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा तीन-चार दिवसांवर आला. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई