शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम विभागाच्या वसाहतीत पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:06 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहतीत मागील तीन दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाºयांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नेहमीच या वसाहतीतील पंपींग स्टेशनमधील पाण्याची मोटर जळत असल्याची ओरड वसाहतीत राहणाºयांकडून होत आहे.

ठळक मुद्देशासकीय कर्मचाऱ्यांची पाण्यासाठी भटकंती : देखभाल दुरूस्तीकडे होताहेत दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहतीत मागील तीन दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाºयांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नेहमीच या वसाहतीतील पंपींग स्टेशनमधील पाण्याची मोटर जळत असल्याची ओरड वसाहतीत राहणाºयांकडून होत आहे.शहरातील पोस्ट आॅफीस चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यतच्या मार्गालगत सार्वजनिक बांधकाम विभागाची वसाहत आहे. या वसाहतीत सर्व विभागातील शासकीय कर्मचारी वास्तव्यास आहे. या इमारतील वास्तव्यापोटी कर्मचाºयांच्या वेतनातून निवास भाडेही कपात केले जाते.परंतू बांधकाम विभागाकडून सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या वसाहतीतील पंपींग स्टेशनमधील पाण्याची मोटर तीन दिवसांपासून जळालेली असल्याने कर्मचाºयांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. यापूर्वीही अनेकदा ही मोटर जळाल्याने येथील नागरिकांना पाणीबाणी सहन करावी लागली. त्यामुळे याबाबत बांधकाम विभागाकडे तक्रार केली असता बांधकाम विभागाच्या विद्यूत विभागाकडे बोट दाखविले जाते. मोटर जळली की तीच दुरुस्त करुन लावली जाते.पण, नवीन मोटर लावून ही समस्या कायम स्वरुपी निकाली काढली जात नाही. निधीची कमतरता असल्याचे कारण पुढे करुन बांधकाम विभाग हात वर करीत आहे. शासकीय कर्मचाºयांच्याच वाटेला हे दुखन असतांना तेथे सर्वसामान्य नागरिकांची काय परिस्थिती होईल, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.गवताने वेढलेल्या कुपननलीकेचा आधारसार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहतीत पाण्याची समस्या निर्माण झाली तर कुपनलीकाचा आधार व्हावा, म्हणून कुपनलीका बसविण्यात आली.परंतू याकडेही दुर्लक्ष असल्याने कुपनलीकेच्या सभोवताली गवताचा वेढा आहे. येथील स्वच्छतेकडेही दुर्लक्ष होत असल्याने वसाहतीतील महिला, पुरुष व चिमुकल्यांना रात्री अंधारात याच कुपनलीकेवरुन पाणी भरण्याची वेळ आली आहे. यामुळे वसाहतीतील नारिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.