शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बोरधरणातून सोडलेले पाणी उठले शेतकऱ्यांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST

सद्या हरभरा व गहू यासह कपाशी व इतर पिकांना ओलीत करण्यासाठी बोरधरणाचे पाणी वितरीकांद्वारे सोडण्यात आले आहे. या वितरीका नियमीत साफ करण्याची व पाण्याचे नियोजन करण्याचे जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे;पण त्याकडे लक्ष देणारी यंत्रणा कुंबकर्णी झोपेत आहे. पाणी सोडण्यापूर्वी मुख्यवितरीका व छोट्या वितरीकांची साफसफाई करणे गरजेचे असते.

ठळक मुद्देसेलूच्या पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : बोरधरणाचे पाणी वितरकांव्दारे शेतकऱ्यांच्या शेतात पोहचवून परिसरात हरित क्रांती व्हावी म्हणून त्या काळात बोर नदीवर धरण बांधण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांच्या कामचुकार व नियोजन शून्य कारभारामुळे या वितरका ठिकठिकाणी फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेताची आणि पिकाची सद्या वाट लागत असल्याचे दिसून येत आहे.सद्या हरभरा व गहू यासह कपाशी व इतर पिकांना ओलीत करण्यासाठी बोरधरणाचे पाणी वितरीकांद्वारे सोडण्यात आले आहे. या वितरीका नियमीत साफ करण्याची व पाण्याचे नियोजन करण्याचे जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे;पण त्याकडे लक्ष देणारी यंत्रणा कुंबकर्णी झोपेत आहे. पाणी सोडण्यापूर्वी मुख्यवितरीका व छोट्या वितरीकांची साफसफाई करणे गरजेचे असते. पण तसे झालेले नाही. त्याकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांनी स्वत:हून नाल्या, नहर, साफ करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाच वितरीकांना नुकसान पोहचविल्याचा दम देवून कारवाई करण्याचा धाक दाखविल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. पाणी सोडण्यापूर्वी मुख्य कालवे वितरीका साफ न केल्याने व शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर वितरीकेत पाणी सोडल्यावर त्या जेसीबीच्या सहाय्याने साफ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केला जात आहे. कोटंबा येथील रविंद्र देवतळे व विठ्ठल गजानन वाघमारे यांच्या शेताची पार वाट लावली आहे. या ठिकाणी काही अंतर सिमेंट काँक्रीटची वितरीका तर उर्वरीत मातीची आहे. संबधीत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सिमेंटने बांधून असलेल्या वितरिकेपेक्षा मातीचे खोदकाम असलेली वितरीका जास्त खोदल्याने पाणी वाहून न जात वितरीकेत मोठ्या प्रमाणात साचते. त्यामुळे जास्त प्रवाहामुळे ती फुटल्याने पूर्ण पाणी शेतातून वाहते. या वितरीकेचे सिमेंटचे बांधकाम अनेक ठिकाणी फुटून पाण्याने मार्ग काढला आहे.पांदण रस्त्याचा झाला नालाकोटंबा वितरीकेसह इतरही ठिकाणी शेतातील पाणी रस्त्यावर येवूनपांदण रस्ते खराब झाले आहे. पिकांच्या सिंचनासाठी धरणाचे पाणी सोडण्यात आले खरे; पण ते सिंचनापेक्षा वायाच जास्त जाते. शेवटच्या शेतकऱ्यांपर्यत पाणी पोहचत नाही. सर्व वितरकांची सफाई व डागडूजी करण्याची गरज असून तशी मागणी आहे.मी अत्यंत गरीब शेतकरी आहे. पाण्याच्या प्रवाहाने ती फुटली. शिवाय कपाशी आणि चणा पीक खराब होत आहे. शेतात पाणी शिरल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.- विठ्ठल वाघमारे, शेतकरी.माझ्या शेतातील पाणी वाहून जाण्यासाठी खोदलेल्या नालीतून नहराच्या पाण्याचा मोठा प्रवाह गेल्याने माझे शेत खचले आहे. आता मला सिमेंट काँक्रीटची नालीच बांधावी लागणार आहे. हा खर्च करण्यासाठी शासनाने मदत केली पाहिजे.- रविंद्र देवतळे, शेतकरी.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पBor Damबोर धरण