शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भूमिगत जलवाहिनीमुळे पाणीप्रश्न निकाली निघेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 22:17 IST

शहरासह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे. महाकाळी येथील धाम प्रकल्प ते येळाकेळी व पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकल्यास ही उपाययोजना कायमस्वरूपी होऊ शकते.

ठळक मुद्देरामदास तडस : निवडणूक विभागाला विनंती करणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे. महाकाळी येथील धाम प्रकल्प ते येळाकेळी व पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकल्यास ही उपाययोजना कायमस्वरूपी होऊ शकते. परंतु, त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येत हे काम मार्गी लावणे गरजेचे आहे. शिवाय सध्या जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे पाणी समस्येचा विषय आचार संहितेतून वगळावा अशी विनंती आपण निवडणूक विभागाकडे करणार असल्याचे खा. रामदास तडस यांनी स्पष्ट केले आहे.वर्धा शहराला महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पिण्याची उचल करून त्याच पाण्याचा पुरवठा शहरातील नागरिकांना केल्या जातो. हा पुरवठा होत असताना महाकाळी येथील धाम प्रकल्प ते येळाकेळी-पवनारपर्यंत संपूर्ण पाणी नदीपात्रातून मार्गक्रमण करते. २६ ते ३० किमी नदी पात्रातून पाणी मार्गक्रमण करीत असताना मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. हेच बाष्पीभवन टाळण्यासाठी तसेच वर्धा शहराची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी पारंपरिक पद्धतीला नविन तंत्रज्ञानाची जोड देऊन भूमिगत पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी आणल्यास भविष्यात फार मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल.महाकाली धाम प्रकल्पातून वर्धा न.प. ला ५.७९ दलघमी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला ४.१८ दलघमी, मध्ये रेल्वे विभागाला १ दलघमी, एमआयडीसीसाठी २.४० दलघमी इतका पाणीसाठा आरक्षीत ठेवण्यात आला आहे. महाकाली धाम प्रकल्पाचे एकूण क्षमता ३२८.६०० दलघमी असून सध्या अतिशय अल्प उपयुक्त जलसाठा या जलाशयात शिल्लक आहे.पर्जन्यमान दरवर्षी बदलत असते कधी जास्त तर कधी कमी राहते. भविष्यात भूमिगत जलवाहिनीद्वारे धाम प्रकल्प ते येळाकेळीपर्यंत कायम स्वरूपी पाणी आणल्यास पाण्याचीही बचत होणार आहे. याकरिता सर्व पक्षांनी एकत्र येत कार्य करण्याची गरज असल्याचे तसेच जिल्हा प्रशासनानेही याविषयी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज खा. रामदास तडस यांनी व्यक्त केली आहे.प्रशासनाने गांभीर्याने विचार करावावर्धा शहरातील व परिसरातील ग्रामपंचायत पाणी पुरवठा करण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन धाम प्रकल्प ते येळाकेळी-पवनारपर्यंत पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्याविषयी प्रशासनानेही गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचे खा. तडस यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस