शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात पाणी पातळी वाढली; पण दुष्काळाचे संकट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 14:08 IST

मागीलवर्षी वर्धा जिल्ह्यातील ११ व नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या ४ अशा एकूण १५ मध्यम व मोठ्या जलाशयात सरासरी ४३.२६ टक्के जलसाठा होता. मात्र, यावर्षी केवळ ३१.५१ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देकोरडेठाक जलाशय झाले पाणीदार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आषाढसरींच्या दमदार आगमनाने जिल्ह्यातील कोरडेठाक पडलेले जलायश पाणीदार झाले. परंतु, मागीलवर्षी या दिवसापर्यंत वर्धा जिल्ह्यातील ११ व नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या ४ अशा एकूण १५ मध्यम व मोठ्या जलाशयात सरासरी ४३.२६ टक्के जलसाठा होता. मात्र, यावर्षी केवळ ३१.५१ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई जाणवली. यावर्षीसुद्धा पावसाअभावी ही टंचाई आणखीच तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोपलेल्या वरुणराजाने जुलै महिन्याच्या अखेरीस हजेरी लावली. आठवडाभर संततधार राहिल्याने जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत जिवंत झाले. इतकेच नव्हे, तर या पावसाच्या सरींमुळे शेतशिवारातही हिरवळ दाटली आहे. यावर्षी आतापर्यंत आठही तालुक्यात ४९१.३८ मि.मी. (५३.३७ टक्के) पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील आठवडाभर झालेल्या पावसामुळे सहा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला. शेतपिकांचे फारसे नुकसान झाले नसून पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. सध्या जलाशयाची पातळीने बऱ्यापैकी वाढली असून अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच आहे. जलसंकट टाळण्यासाठी सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

शहरासह १३ गावांना मिळाला आधार‘मरणाला रात्र आडवी’ ही म्हण नेहमी ऐकली जाते.पण, ही परिस्थिती यावर्षी वर्धेकरांनी अनुभवली आहे. वर्ध्यासह लगतच्या १३ गावांना महाकाळीच्या धाम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी या जलाशयातील मृतसाठाही उचलण्यात आला. मृतसाठ्यातून शेवटचे पाणी सोडून पाणीपुरवठा केल्यांनतर पुढे पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. गांभीर्य लक्षात घेऊन कृत्रिम पाऊस पाडण्याच्याही हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, आषाढसरींनी संततधार कायम ठेवल्याने या संकटावर पांघरूण पडले आणि पाण्याचा प्रश्न मिटला. सध्या धाम जलाशयात ३०.२९ टक्के (१८.०२ दलघमी) जलसंचय झाला आहे. मागीलवर्षी याच दिवसापर्यंत ३२.७५ टक्के जलसाठा होता.

टॅग्स :Rainपाऊस