शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

वॉटर कप स्पर्धा झाली लोकचळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 22:37 IST

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत आता बरीच रंगत आली आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांतील २१० गावांत जलसंधारण कामांसाठी हजारो हात सरसावले आहेत. दररोज महाश्रमदानातून गावांना जलमय करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

ठळक मुद्देखुबगाव, परसोडी, सालई पेवट या गावांत महाश्रमदान : दररोज झटताहेत हजारो हात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत आता बरीच रंगत आली आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांतील २१० गावांत जलसंधारण कामांसाठी हजारो हात सरसावले आहेत. दररोज महाश्रमदानातून गावांना जलमय करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. वॉटर कप ही आता केवळ स्पर्धा राहिली नाही तर तिला लोकचळवळीचे स्वरूप आल्याचेच दिसत आहे.खुबगाव येथे सर्वपक्षीय श्रमदानआर्वी - खुबगाव येथील वाठोडा मार्गावर सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील जलसंधारणाच्या कामांनी चांगलाच वेग घेतला आहे. ही स्पर्धा आता लोकचळवळ झाली असून यात गावातील सुशिक्षीत युवा पिढी, गृहीणी, महिला सरपंचा सोबतच आ. अमर काळे, पं.स. उपसभापती धर्मेंद्र राऊत, डॉ. रिपल राणे, पत्रकार, वकील यांच्यासह १०० ते १५० लोकांनी श्रमदानात भाग घेतला. खुबगाव शिवारात सुमारे दोन तास चाललेल्या श्रमदानात १४५ घनमीटर काम झाले. लहान-थोरांपासून विविध सामाजिक संघटनांनी तथा राजकीय पक्ष, संघटनेचे पदाधिकारी तथा महिला पुरूषांनी न थकता परिश्रम करीत सहभाग घेतला. सर्वांनी टिकास, फावडे, टोपले घेऊन आपापली जबाबदारी समजून श्रमदान केले. श्रमदान करण्याकरिता आ. अमर काळे, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, बाका सोनटक्के, लॉयन्स क्लबचे रिपल राणे, माजी न.प. उपाध्यक्ष पुरूषोत्तम नागपुरे, सुशील ठाकुर, परवेज साबीर, मित्रपरिवाराचे गौरव जाजू, पर्यावरण समितीचे पदाधिकारी, व्हॉलीबॉल समर कॅम्पचे कपील ठाकूर, पं.स. उपसभापती धर्मेंद्र राऊत, अ‍ॅड. गुरुणा सिंघाणी, अ‍ॅड. मिलिंद राऊत व वकील तसेच जयंत देवरकर, पाणी फाऊंडेशनचे करटकार, नितीन टरके, तृष्णा उमक, प्रणाली गवळी, शुभम अमझरे, यश बोरगावकर, खुबगावच्या सरपंच वनमाला काळपांडे, उपसरपंच दिलीप गवळी, पं.स. सदस्य अशोक तुमडाम, प्रमोद मोहोड, देवराव भाकरे, ग्रा.पं. सदस्य, महिला बचत गटांनी श्रमदान केले. आ. काळे यांनी आतापासूनच पाण्याची बचत कशी करता येईल, यासाठी जनतेने सर्तक राहण्याचे आवाहन केले. श्रमदात्यांचे आभार शरद उमक यांनी मानले.परसोडीत शिक्षकांचे श्रमदानविरुळ (आकाजी) - वाटर कप स्पर्धेत सहभागी परसोडी गावात श्रमदानाचे तुफान कायम आहे. गावातील महिला, पुरुष, युवक तथा चिमुकले सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अविरत श्रमदान करीत आहे. जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांनी परसोडी येथे श्रमदान केले. नेहरु विद्यालय विरुळ, विवेक महाविद्यालय मांडवा येथील शिक्षकांनीही गावात श्रमदान केले. सर्वांनी मिळून अवघ्या चार तासांतच २१० मिटर मीठाईचा बांध खोदला. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम बांधावरच ऐकला.जलमित्र परिवार सालई येथे महाश्रमदानहिंगणी - सेलू तालुक्यातील सालई (पेवट) येथेही पाणी फाऊंडेशन अंतर्गत महाश्रमदान केले जात आहे. त्यांना प्रोत्साहन देतानाच ग्रामस्थांचा सहभाग वाढावा म्हणून हिंगणी येथील जल मित्र परिवाराने प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन विविध उपक्रम राबविण्यास प्रारंभ केला. हातात टिकास, फावडे व टोपले घेऊन ते काम करीत असून पाणी संवर्धनाचे महत्त्व पटवून देत आहेत. समाजातील विविध बाबींवर जल मित्र परिवार सामाजिक बांधीलकी जोपासत श्रमदानात प्रत्यक्ष सहभाग घेत आहे. यात नितीन निघडे, पोलीस पाटील मारोती चचाणे, रूपेश ठाकरे, आशिष कांबळे, शुभम सराफ, मंगेश काळे, गजानन सातपुते, सचिन देवरे, सागर धवणे, विकी जाधव, कुणाल बोरकर, अनुज निघडे, जुगनाके यासह ४० मुले तथा गावातील वृद्ध, युवक, महिला, चिमुकले राबत आहेत. तत्पूर्वी बोरी, बोरधरण येथे श्रमदान केले. अन्य गावांतही ते पोहोचणार आहेत.