शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
5
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
6
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
7
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
8
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
9
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
10
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
11
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
12
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
13
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
14
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
15
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
16
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
17
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
18
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
19
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
20
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

जलयुक्त शिवाराचा पिकांना फायदा होणार

By admin | Updated: August 22, 2015 02:21 IST

महाराष्ट्र शासन कृषी व जलसंधारण विभाग ‘सर्वासाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमानुसार जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मौजा सास्ती या निवड झालेल्या गावात...

वर्धा : महाराष्ट्र शासन कृषी व जलसंधारण विभाग ‘सर्वासाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमानुसार जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मौजा सास्ती या निवड झालेल्या गावात जुन्या सिमेंट बंधाऱ्याचे नूतनीकरण, नालाखोलीकरण, रुंदीकरण व शेततळे उभारण्याचे काम नियोजित आहे. याचा अपेक्षित निधी ५४ लाख आहे. याचा खरीप व रबी दोन्ही हंगामात फायदा होईल, असे मत आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केले. सास्ती येथे आमदार कुणावार यांच्या हस्ते जलपूजन आणि वृक्षारोपण करण्यात आले. जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमांतर्गत नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाची पाहणीही त्यांनी केली. सध्या नाला खोलीकरण व रुंदीकरणाची चार कामे झालेली असून कामाची लांबी ५६० मिटर आहे. त्यावर ११.७५ लाख रुपये खर्च झाला आहे. सदर नाला खोलीकरण व रुंदीकरण कामामुळे २७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे शिवारातील नाल्याच्या परिघातील १७ विहिरीच्या जलस्तरामध्ये १०० टक्के वाढ झालेली आहे. दुबार व तिबार हंगामासाठी सिंचनाची व्यवस्था झालेली असल्याचेही ते म्हणाले. गावचे सरपंच विकास इंगळे आमदार कुणावार यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. ता.कृ.अ. एस.डी.साखरे व मोरे यांनी सदरील कामाचे उद्दीष्ट, उपलब्ध पाणी साठा व कामावर झालेला खर्च या बाबत सविस्तर माहिती दिली. मेश्राम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जलपुजन कार्यक्रमाला जि. प. सदस्य माधुरी चंदनखेडे, वसंत आंबटकर, प्रफुल्ल बाहे, माजी जि. प.सदस्य ओंकार मानकर, पं. स.सदस्य माधव चंदनखेडे, उपसरपंच सरोज बोरकर, ग्रा. पं. सदस्य गजानन उमाटे, डॉ. टी. वाय. ठाकरे, प्रा. किरण वैद्य, ग्रा. प. पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. यशस्वीतेकरिता एस. आर. रहाटे, ए. व्ही. कोहळे, आर. जी. कुबडे, अमोल भडे, गुजरकर आदींनी सहकार्य केले.