शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तीन गावांत जलसंकट गडद; धरणाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 21:59 IST

देवळी तालुक्यातील नाचणगाव, पुलगाव व गुंजखेडा या तिन्ही गावांमध्ये पाणी संकट गडद होत आहे. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नदीचे पात्रही कोरडे पडल्यामुळे निम्न वर्धा धरणाचे पाणी सोडा व पाणी साठविण्याची व्यवस्था करा, अशी मागणी या तिन्ही गावातील नागरिकांसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : देवळी तालुक्यातील नाचणगाव, पुलगाव व गुंजखेडा या तिन्ही गावांमध्ये पाणी संकट गडद होत आहे. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नदीचे पात्रही कोरडे पडल्यामुळे निम्न वर्धा धरणाचे पाणी सोडा व पाणी साठविण्याची व्यवस्था करा, अशी मागणी या तिन्ही गावातील नागरिकांसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.नाचणगांव, पुलगांव व गुंजखेडा हे तिन्ही गावे वर्धा नदीच्या तिरावर वसलेले आहे. या तिन्ही गावांना याच नदीतून पाणी पुरवठा केल्या जातो.पण, सध्या नदीपात्र कोरडे असल्यामुळे तिन्ही गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. दिवसेंदिवस पाणी समस्या तीव्र होत असल्यामुळे निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी सोडावे तसेच ते पाणी साठविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी गावकºयांनी निवेदनातून केली आहे. तसेच या मागणीचे निवेदन आमदार रणजित कांबळे यांनाही देण्यात आले आहे. जिल्हाधिकाºयांना निवेदन देताना काँगसचे पुलगाव शहरअध्यक्ष रमेश सावरकर, गुजखेडाच्या सरपंच वहिदा शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद वंजारी, देवळी पंचायत समितीचे माजी सभापती मनोज वसू, नागचणगावचे माजी सरपंच शब्बीर पठाण, माजी नगरसेवक देवकांत सहारे, पंचायत समिती सदस्य अशोक इंगळे, नाचणगावचे उपसरपंच सुरेश देवतळे, देविदास आसोले व गुंजखेडाचे उपसरपंच चंद्रकांत कांबळे यांची उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईcollectorजिल्हाधिकारी