शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात दहा गावांवर जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:18 IST

एप्रिल महिन्याच्या मध्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावट तीव्र होते. यावर्षीही आर्वी तालुक्यातील आठ ग्रामपंचायती अंतर्गत दहा गावांत पाणीटंचाईचे सावट तीव्र झाले आहे.

ठळक मुद्देतीव्र पाणीटंचाई : कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देण्याची गरज

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : एप्रिल महिन्याच्या मध्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावट तीव्र होते. यावर्षीही आर्वी तालुक्यातील आठ ग्रामपंचायती अंतर्गत दहा गावांत पाणीटंचाईचे सावट तीव्र झाले आहे. यात या दहा गावांतील ४ हजार ८८८ लोकसंख्या असणाऱ्या ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मे महिन्यात ही पाणीटंचाई अधिक तीव्र होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.आर्वी तालुक्यातील धनोडी, टेंभरी, परसोडी, एकलारा, कर्माबाद, पिंपळझरी, मारडा, दिघी, साखखेडा, हिवरा या दहा गावांचा पाणीटंचाईत समावेश आहे. याबाबत १ एप्रिल ते ३० जून या तीन महिन्याच्या कालावधीत पाणीटंचाई उपाययोजना कृती आराखडा अंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील उपाययोजनेला सुरूवात झाली आहे. आर्वी तालुक्यातील या दहा गावांना पाणीटंचाई भासू नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत.या दहा गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी २२ सार्वजनिक विहिरी, २२ खासगी विहिरी, ३१ हातपंप, दोन विद्युतपंप व सहा नळयोजना अशा उपाययोजना पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सूचविण्यात आल्या आहेत. हे सर्व पाण्याचे स्त्रोत असले तरी नवीन कृती आराखड्यानुसार एक सार्वजनिक विहीर खोल करणे, तीन गावांत खासगी विहिरीचे बांधकाम करणे तथा अधिग्रहण करणे, सहा ठिकाणी नवीन हातपंप बसविणे, धनोडी व एकलारा या गावात नळयोजनेची विहीर दुरूस्त करणे, टेंभरी येथे पाईपलाईन दुरूस्त करणे, आदी उपाययोजनांचा समावेश करण्यात आलेला अआहे. यात या गावांत येत्या तीन महिन्यांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी दखल घेत कार्यवाही करणे गरजेचे आहे.आर्वी तालुक्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कृती आराखड्यांतर्गत तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विहीर अधिग्रहित करणे तथा नळयोजना व इतर तातडीच्या उपाययोजना आखणे सुरू आहे.- प्रा. धर्मेंद्र राऊत, उपसभापती, पं.स. आर्वी.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई