औरंगाबाद : ह्युंंदाई या कोरियन कारनिर्मिती कंपनीची उपकंपनी असणाऱ्या किया मोटर्सचे औरंगाबादेतील आगमन निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी औरंगाबाद दौऱ्यात याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. किया मोटर्ससोबतच तिच्या पुरवठादार असणाऱ्या शंभरावर लहान-मोठ्या कोरियन कंपन्या औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीत (आॅरिक) येतील. किया मोटर्सच्या माध्यमातून औरंगाबादेत आतापर्यंतची सर्वाधिक विदेशी गुंतवणूक होणार आहे.उद्योग स्थापनेच्या वेळी औरंगाबादेत सर्वाधिक गुंतवणूक करण्याचा बहुमान बजाज आॅटोकडे जातो. देशी उद्योग असणाऱ्या बजाज आॅटोने नंतर वेळोवेळी गुंतवणुकीत वाढ केली. स्कोडा, बोना ट्रान्स, पर्किन्स या विदेशी उद्योगांनी औरंगाबादेत गुंतवणूक केली. यापैकी पर्किन्सची गुंतवणूक ७५० कोटी रुपयांची ठरली. आता किया मोटर्सच्या रूपाने सुमारे पाचहजार कोटींची सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक औरंगाबादेत होणार आहे.
कॅनलला पाणी...
By admin | Updated: November 6, 2016 00:55 IST