शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉटर एटीएम’ठरले मद्यपींना फायद्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 21:47 IST

सर्वसामान्यांना अत्यल्प मोबदल्यात पाण्याची सोय व्हावी म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविधा इमारतीच्या आवारात ‘वॉटर एटीएम’ सुरू करण्यात आले. या एटीएमची सर्वसामान्यांना विशेष माहिती नसली तरी या भागात रात्रीला रंगणाऱ्या दारू पार्टीत सहभागी होणाऱ्यांना त्याची पूरेपूर माहिती आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय इमारतीत रंगणाऱ्या दारू पार्टीला थंड पाण्याची सोय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सर्वसामान्यांना अत्यल्प मोबदल्यात पाण्याची सोय व्हावी म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविधा इमारतीच्या आवारात ‘वॉटर एटीएम’ सुरू करण्यात आले. या एटीएमची सर्वसामान्यांना विशेष माहिती नसली तरी या भागात रात्रीला रंगणाऱ्या दारू पार्टीत सहभागी होणाऱ्यांना त्याची पूरेपूर माहिती आहे. सर्वसामान्यांना जरी या एटीएमचा लाभ होत नसला तरी या मद्यपींना होत असल्याचे दिसते. या आवारात भरणाऱ्या रात्रीच्या पार्टीतील अनेकांकडून येथील थंड पाण्याचा चांगलाच लाभ घेण्याचा प्रकार येथे घडत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यावर प्रतिबंध लावत त्याचा सर्वसामान्यांना लाभ व्हावा या दिशेने उपाययोजना आखण्याची मागणी आहे.नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या वॉटर एटीमचे लोकार्पण झाले. यात ठराविक रक्कम टाकताच थंड पाणी मिळण्याची सुविधा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह येथील प्रशासकीय इमारतीत येत असलेल्या सर्वसामान्यांना पाण्याकरिता अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसू नये म्हणून या भागात ही सुविधा करण्यात आली आहे. जिल्ह्यात विविध कामांकरिता येणाऱ्यांची गर्दी याच भागात अधिक असल्याने त्यांना या सुविधेचा लाभ होणे अपेक्षित धरण्यात आले होते. या अपेक्षेनुसार काम होईल, अशी आशा जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना असताना त्याचा येथे वेगळाच वापर होत असल्याचे समोर येत आहे.वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असली तरी ती कुठेही आणि सहज उपलब्ध होते, यात शंका नाही. दारू विकत घेतल्यानंतर ती घेण्याकरिता जागेची समस्या असल्याने अनेकांकडून प्रशासकीय भवनाचा आधार घेण्यात येत असल्याचे पोलिसांकडून अनेकवेळा झालेल्या कारवाईतून उघड झाले आहे. तरीही येथे दारूच्या पार्ट्या सुरूच असतात. याच मद्यपींना आवश्यक असलेले थंड पाणी या वॉटर एटीएममधून मिळत असल्याने त्यांचा अतिरिक्त पाण्याचा खर्च वाचत आहे. यामुळे हे एटीएम त्यांच्याकरिता लाभाचे ठरत असल्याचे दिसत आहे. यामुळे या प्रकारावर आळा घालण्याची मागणी या भागात येणाऱ्या नागरिकांकडून करण्यात आली आहे.रात्रीला मशीन किंवा दार बंद ठेवण्याची मागणीसर्वसामान्य नागरिकांकरिता सुरू करण्यात आलेल्या वॉटर एटीएमचा लाभ त्यांना होणे अपेक्षित असताना तसे होत नाही. मद्यपींकडून रात्रीच्या वेळीच त्याचा अधिक वापर होतो. हा प्रकार टाळण्याकरिता हे एटीएम असलेल्या इमारतीचे दार रात्री बंद करावे किंवा ही मशीनच रात्री बंद करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Waterपाणी