शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
4
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
5
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
7
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
8
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
9
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
10
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
11
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
12
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
13
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
14
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
15
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
16
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
17
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
19
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
20
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!

गौण खनिजांच्या वाहतुकीवर ‘वॉच’; जिल्ह्यात ‘फ्लाइंग स्कॉड’ कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 21:36 IST

प्रशासनाकडून कारवायांचा बडगा उगारला जात असला तरी असे गैरप्रकार सुरूच आहेत. अनेकदा महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर माफियांकडून हल्लेही झाले आहेत. एकीकडे सरकारचा महसूल बुडत असताना अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीचे ‘उद्योग’ मात्र सुरूच आहेत. ते थोपविण्यासाठी महसूल विभागाने आता आठही तालुक्यात दोन ते  तीन भरारी पथके कार्यान्वित केली आहेत. यामुळे गौण खनिज ठेकेदार आणि वाहतूकदारांकडून मारल्या जाणाऱ्या भूलथापांना चाप बसणार आहे. 

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अवैध गौण खनिज वाहतुकीद्वारे स्वत:चे उखळ पांढरे करणाऱ्या ठेकेदारांच्या मुसक्या आता महसूल विभागाने आवळल्या आहेत. महसूल विभाग ॲक्शन मोडवर आला असून, उत्खननापासून वाहतुकीपर्यंतच्या प्रक्रियेवर वॉच ठेवणारी गौण खनिज उत्खनन नियंत्रणासाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यात ‘फ्लाइंग स्कॉड’(भरारी पथक) कार्यान्वित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तहसीलदारांना दिले आहेत. अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक हा सातत्याने कळीचा मुद्दा ठरला आहे. प्रशासनाकडून कारवायांचा बडगा उगारला जात असला तरी असे गैरप्रकार सुरूच आहेत. अनेकदा महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर माफियांकडून हल्लेही झाले आहेत. एकीकडे सरकारचा महसूल बुडत असताना अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीचे ‘उद्योग’ मात्र सुरूच आहेत. ते थोपविण्यासाठी महसूल विभागाने आता आठही तालुक्यात दोन ते  तीन भरारी पथके कार्यान्वित केली आहेत. यामुळे गौण खनिज ठेकेदार आणि वाहतूकदारांकडून मारल्या जाणाऱ्या भूलथापांना चाप बसणार आहे. 

आठही तालुक्यातील विविध मार्गांवर उभारण्यात आले ‘चेकपोस्ट’ - गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी आठही तालुक्यात भरारी पथके नेमून विविध मार्गांवर ‘चेकपोस्ट’ स्थापन करण्यात आले आहेत. या चेकपोस्टवर सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत स्थायी पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकात १ तलाठी, १ कोतवाल, १ पोलिस शिपाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पथकातील सदस्य विनापरवानगी गैरहजर राहिल्यास व कर्मचारी दोषी आढळल्यास कार्यवाही करण्यात येणार आहे. - जिल्ह्यातील वर्धा तालुक्यात सेवाग्राम येथील कस्तुरबा चौक,  सेलू तालुक्यातील सिंदी रेल्वे ते भोसा रस्त्यावर, देवळी तालुक्यात भारत टेक्सटाइल मिलजवळ, रेल्वे फाटक पुलगाव, आर्वी तालुक्यात वर्धा ते तळेगाव रस्त्यावरील वळण रस्त्यावर असलेल्या वसंतराव नाईक चौक/पिंपळगोटा. आष्टी तालुक्यात जामगाव फाटा, कारंजा तालुक्यात नारा ते कारंजा रस्त्यावर, हिंगणघाट तालुक्यात नंदोरी चौक जामकडे जाणारा रस्ता व हिंगणघाट शहरात जाणाऱ्या रस्त्यावर आणि समुद्रपूर तालुक्यात मांडगाव रस्त्यावर ‘चेकपोस्ट’ उभारण्यात आले आहे. 

भरारी पथक राहणार २६/७ दक्ष- गोण खनिजांचे अवैध उत्खनन, साठवणूक व वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच अवैध वाळूसाठ्याबाबतची कार्यवाही अधिक तीव्र होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, तालुकास्तरावर २४/७ भरारी पथक कार्यान्वित केले आहे. अवैध उत्खनन व वाहतुकीदरम्यान दोषी आढळून आल्यास संबंधित वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. 

सात दिवसांनंतर पथकात होणार बदल... - प्रत्येक तालुक्यात जवळपास २ ते ३ भरारी पथके स्थापन करण्यात येणार आहे. भरारी पथकातील अधिकारी, कर्मचारी सात दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी कार्यान्वित राहणार नसून त्यांच्यात सात दिवसानंतर बदल करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून आठही तालुक्यात चेकपोस्ट आणि भरारी पथके कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. यामुळे वाळूमाफिया तसेच गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करणाऱ्या चोरट्यांवर आळा बसण्यास मदत होईल. पारदर्शी प्रक्रिया राबविण्यासाठी कारवाईचे छायाचित्रीकरण व फोटोग्राफी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. अतुल दौड,  जिल्हा खनिकर्म अधिकारी, वर्धा

वाळू माफियांचा नवा फंडा; कारवाईक-डे लागले लक्ष...

एकीकडे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. यासाठी महसूल विभाग आणि पोलीस विभागातील यंत्रणा अलर्ट झाल्याचे दिसून येत आहे. दररोज पोलीस विभागाकडून कारवाई देखील केली जात आहे. 

मात्र, दुसरीकडे महसूल विभागातीलच काही ‘बड्या’ अधिकाऱ्यांच्या मुकसंमतीने रात्रीच्या सुमारास काही ठिकाणी अजूनही वाळूचा अवैधरित्या उपसा केला जात असल्याचे दिसून येत आहे. चोरटे वाळूचा उपसा करुन डील परमिट असलेल्या ठिय्यावर नेऊन टाकत असल्याचे चित्र आहे.

सध्या काही ठिकाणी सुरु असलेला हा प्रकार तहसीलदारांच्या आर्शीवादाने होत असल्याची चर्चा आहे. एवढंच नव्हे तर त्या तहसीलदाराला याबाबतची पूर्ण कल्पना देऊनही कारवाई केली जात नसल्याने जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात याकड लक्ष लागले आहे.

नायब तहसीलदार राहणार पथक प्रमुख  - प्रत्येक तालुक्यात २ ते ३ भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली असून पथकप्रमुखाची जबाबदारी नायब तहसीलदारांच्या खांद्यावर आहे. पथकात १ मंडळ अधिकारी, दोन तलाठी, २ पोलिस शिपाई, १ कोतवाल यांचा समावेश राहणार आहे. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीRevenue Departmentमहसूल विभाग