शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मोझरी परिसरातील मार्गांने बिकट वहिवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 21:28 IST

मागील काही वर्षापूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत गावा तेथे रस्ता तयार करण्यात आला. परंतु त्यानंतर या डांबरी रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांचा खड्डेमय प्रवास सुरु झाला. तो अद्यापही थांबला नसल्याने मोझरी परिसरातील नागरिकांची वहिवाट बिकट झाली आहे.

ठळक मुद्देझुडपांचे अतिक्र मण : नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमोझरी (शे) : मागील काही वर्षापूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत गावा तेथे रस्ता तयार करण्यात आला. परंतु त्यानंतर या डांबरी रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांचा खड्डेमय प्रवास सुरु झाला. तो अद्यापही थांबला नसल्याने मोझरी परिसरातील नागरिकांची वहिवाट बिकट झाली आहे.मोझरी (शेकापूर) ते कानगाव या मार्गाने नेहमी वर्दळ असते. परंतु या मार्गाची दुरावस्था झाल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोझरी, खानगाव, आंबोडा हा मार्ग पूर्णत: खड्डेमय स्थितीत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. मोझरी (शे.), पोटी मार्गावर अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडलेले आहे. तसेच नाल्यावरील पुलांची स्थितीही खराब आहे. मोझरी ते कापसी हा ७ किलो मीटर अंतराचा मार्ग स्वातंत्र्यापासून अजुनही दुर्लक्षित आहे. या मार्गावर आतापर्यंत साधे खडीकरणही झाले नाही. याला शासनाची उदासीनता म्हणावे की लोकप्रतिनिधीचे अपयश, असा मतप्रवाह नागरिकांमध्ये दिसून येतो. विकासाच्या कामामध्ये या भागावर नेहमीच दुजाभाव केल्या जात असल्याची ओरड होत आहे. अनेक विकास कामे ही लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे प्रलंबित असल्याचे बोलले जात आहे. या मार्गाची मागील अनेक वर्षापासून उखडलेल्या रस्त्यांवरुनच नागरिकांचा प्रवास सुरु असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांचेही नुकसान होत असून वाहनचालकांसह प्रवाशांनाही पाठीचा व मानक्याचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील मार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वारंवार केली प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे केली. मात्र अद्यापही या मागणींची दखल घेतली नसल्याने मार्गाचे भाग्य उजळले नाही. परिणामी मार्गावर अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. सध्या खड्डेमय रस्त्यांच्या सोबतीला रस्त्याच्या कडेला वाढलेली झुडपेही त्रासदायक ठरत आहे. या झुडपांमुळे अतिक्रमण वाढल्याने रस्ते अरुंद झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देत झुडूपांचे अतिक्रमण हटवावे आणि रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी मोझरीसह परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी