शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

एकबुर्जी शिवारात ‘वॉश आऊट’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:26 IST

खरांगणा (मो.) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकबुर्जी शिवारातील नाल्याच्या काठावर गावठी दारूची निर्मिती करून त्याची परिसरातील गावांमध्ये विक्री केली जात असल्याची तक्रार दारूबंदीसाठी कार्य करणाऱ्या काही महिलांनी खरांगणाचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्याकडे केली.

ठळक मुद्दे२.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त : महिलांच्या तक्रारींची ठाणेदारांकडून दखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरांगणा (मो.) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकबुर्जी शिवारातील नाल्याच्या काठावर गावठी दारूची निर्मिती करून त्याची परिसरातील गावांमध्ये विक्री केली जात असल्याची तक्रार दारूबंदीसाठी कार्य करणाऱ्या काही महिलांनी खरांगणाचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्याकडे केली. सदर तक्रारीची ठाणेदारांकडून दखल घेण्यात आली. शिवाय छापा टाकून करण्यात आलेल्या कारवाईत गावठी दारूसह दारूगाळण्याचे साहित्य असा एकूण २ लाख ४२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जिल्ह्यात दारूबंदी असताना एकबुर्जी शिवारात गावठी दारूची निर्मितीकरून त्याची विक्री परिसरातील गावांमध्ये केली जात असल्याने त्याचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागतो. दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजाणीसह महिलांची समस्या लक्षात घेता तात्काळ योग्य कारवाई करण्याची मागणी दारूबंदी महिला मंडळाच्यावतीने ठाणेदार संतोष शेगावकर यांच्याकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेवून ठाणेदार शेगावकर यांच्या प्रत्यक्ष हजेरीत एकबुर्जी शिवारातील वानखेडे यांच्या शेताशेजारी असलेल्या नाल्या शेजारी सुरू असलेल्या दारूभट्टीवर खरांगणा पोलिसांनी छापा टाकला. याप्रसंगी पोलिसांनी दारूविक्रेता मनोहर सलामे याला ताब्यात घेवून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गावठी दारू, कच्चा मोहरसायन सडवा, दारू गाळण्याचे साहित्य व दारूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारा एम.एच. ३१ सी.व्ही. ६३३९ क्रमांकाचा आॅटो असा एकूण २ लाख ४२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी खरांगणा (मो.) पोलीस ठाण्यात आरोपी मनोहर सलामे, कवडू उर्फ सुनील इरपाचे दोन्ही रा. एकबुर्जी आणि निखिल श्रीरामे व राकेश भांडवे दोन्ही रा. पाचोड यांच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मनोहर याला पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध खरांगणा पोलीस घेत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संतोष शेगावकर, पोलीस कर्मचारी किशोर अप्तूरकर, किरण बोरसरे, गणेश गायकी, शशीकांत मुंडे, अमर हजारे, दिनेश गायकवाड आदींनी केली. कारवाईदरम्यान एकबुर्जी येथील उमेश सलामे, नयन लांडगे, शुभम मडावी, आकाश नागोसे, मंगेश सलामे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :liquor banदारूबंदी